महाराष्ट्र शासन कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या वतिने आयोजन…!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : मालवण तालुक्यातील वराड येथे शेती अवजारांची देखभाल व दुरुस्तीविषयीच्या प्रशिक्षणाचे आयोजन ,
गुरुकृपा कृषि सेवा केंद्र, येथे करण्यात आले होते. महाराष्ट्र शासन कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत खरीप हंगामाच्या शेती अवजारांची देखभाल व दुरुस्ती या विषयीच्या सदर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
तालुका कृषि अधिकारी विश्वनाथ गोसावी व कृषि अधिकारी दिनेश लंबे यानी कृषि विभागाच्या यांत्रिकीकरण योजनेचा लाभ शासनाच्या महाडिबीटी पोर्टलवरुन लाभार्थ्यास कशाप्रकारे घेता येतो याबाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले. त्यानंतर किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लि. पुणे प्लांटचे तंत्रज्ञ श्री. आकाश होंडे व तळगाव येथील शेती अवजारांचे मॅकॅनिक आकाश दळवी यांनी शेती अवजारे जसे की पॉवर टिलर, पॉवर विडर, ग्रासकटर, चेनसॉ, इ. यंत्रांच्या हाताळणीविषयी तांत्रिक मार्गदर्शन केले. यावेळी तालुका कृषि अधिकारी विश्वनाथ गोसावी, कृषि अधिकारी दिनेश लंबे, कृषि पर्यवेक्षक धनंजय गावडे, कृषि पर्यवेक्षक धामापूरचे सिताराम परब, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक निलेश गोसावी, कृषि सहाय्यक सुषमा धामापूरकर, गुरुकृपा कृषि सेवा केंद्राचे मालक सतिश वंजारी, आत्मा शेतकरी सल्ला समिती सदस्या उज्ज्वला दळवी, ग्रामपंचायत सदस्य सोमा परब आदी व आसपासच्या गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषि सहाय्यक पवनकुमार सौंगडे यांनी केले तर आभार प्रदर्शन कृषि पर्यवेक्षक मंदार सरमळकर यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गुरुकृपा कृषि सेवा केंद्राचे सतिश वंजारी व कर्मचारी यांचे बहुमोल असे योगदान लाभले.