महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा -मालवणचा उपक्रम
पोईप/ओंकार चव्हाण : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा मालवणच्यावतीने व साळेल कट्टा केंद्राचे केंद्रप्रमुख श्रीकृष्ण सावंत यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्याने प्रायोजित तालुकास्तरीय विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये बालकथाकथन,हस्ताक्षर, इयत्ता ५वी व इयत्ता ८वी तील शिष्यवृत्ती सराव परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गुणगौरव कार्यक्रम केंद्रशाळा आचरे नं.१ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सदर कार्यक्रम हा आचरा प्रभागातील यशस्वी विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला होता. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, गौरवप्रमाणपत्र, गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.तसेच साहित्यिक, लेखक, कवी म्हणून सिंधुदुर्ग ज़िल्ह्यात ख्याती असलेले आदरणीय. रामचंद्र कुबल सर (शाळा आडवली नं १) यांच्या लेखणीतून उत्कृष्ट कथा व पटकथा साकार लघुचित्रपट ‘झूल्बी ‘ला आंतरराष्ट्रीय स्तरावर मानांकन प्राप्त आणि आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी मालवण तालुक्यातून मानांकन प्राप्त झालेले आदर्श शिक्षक आदरणीय श्री. राजन जोशी सर (शाळा चिंदर बाजार )यांचा संघटनेच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्यावेळी बोलताना म. रा. प्रा. शि. समिती शाखा -सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री.नितीनजी कदम यांनी शिक्षक समिती ही नेहमीच विविध उपक्रम राबवित आपली बांधिलकी ही विद्यार्थी हिताची व सामाजिक जाणीवेची असल्याचे सिद्ध करत आली आहे. शिक्षक नेते ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय. भाई चव्हाण यांनी शिक्षक समिती जशी शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आक्रमक आहे तशीच बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी सुद्धा कटिबद्ध आहे असे सांगितले.
शिक्षक नेते श्री.मंगेश कांबळी यांनी समिती राबवीत असलेल्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.परमानंद वेंगुर्लेकर यांनी संघटना विद्यार्थी, शिक्षण,शिक्षक यांच्या प्रश्नांसाठी कटिबद्ध आहे असे सांगितले.
कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर म. रा. प्रा. शि. समिती चे जिल्हाध्यक्ष श्री. नितीन कदम, मालवण तालुका अध्यक्ष श्री. परमानंद वेंगुर्लेकर, ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. भाई चव्हाण,सचिव श्री. नवनाथ भोळे, कार्याध्यक्ष श्री. रुपेश गरुड,स्पर्धा प्रायोजक केंद्रप्रमुख श्री. श्रीकृष्ण सावंत,शिक्षक नेते श्री. मंगेश कांबळी,मालवण शिक्षक पतपेढी संचालक श्री. राजेंद्रप्रसाद गाड,जिल्हासंघटक श्री. विनोद कदम, श्री. झाडे, श्री.असरोंडकर आचरे केंद्रप्रमुख श्रीम. सुगंधा गुरव, मुख्याध्यापक केंद्रशाळा आचरे नं १. श्रीम. जोशी आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. संजय परब, श्री. नेवाळकर यांचे वाढदिवस अभिष्टचिंतन करण्यात आले. सर्व शिक्षक वर्ग, पालक वर्ग, गुणवंत विध्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व मार्गदर्शकांची समायोचित भाषणे झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. नवनाथ भोळे यांनी केले. आपल्या ओघवत्या शैलीने सर्वांना प्रभावित करत श्री.राज खानेकर यांनी बहारदार सूत्रसंचालन केले. तसेच शेवटी आपल्या बुलंद आणि तडफदार अंदाजासाठी सुपरिचित असलेले श्री. यशवंतराव पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.