५२ रक्तदात्यांनी केले रक्तदान ; यामध्ये २ महिला रक्तदात्यांनी रक्तदान केले.
कणकवली | उमेश परब : कै. दिपलक्ष्मी दत्ताराम मडव यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ रक्तमित्र अमेय मडव मित्रपरिवार आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिरामध्ये ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन कणकवली तहसीलदार श्री रमेश पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर जि. प. सदस्या स्वरूपा विखाळे, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रा. स. संदिप मेस्त्री, ग्रा. स. सायली पवार, जांभवडे हायस्कुल चेअरमन सुभाष मडव, श्री. शशिकांत रगजी, शांताराम नाईक, मा. नगरसेवक महेंद्र सांबरेकर, एकनाथ मडव, दत्ताराम मडव, चंद्रकांत तेली, डॉ सागर पटेल आदी उपस्थित होते.भारतामध्ये रक्तदानाचे प्रमाण खूप कमी असुन रुग्णांची गरज लक्षात घेता रक्तदानाचे प्रमाण वाढले पाहिजे असे प्रतिपादन कणकवली तहसीलदार श्री रमेश पवार यांनी केले आणि शिबिरास शुभेच्छा दिल्या.
रक्तमित्र अमेय मडव मित्रपरिवार आणि सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिरास ५८ रक्तदात्यांनी हजेरी लावली त्यापैकी ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले तर ६ रक्तदाते तांत्रिक कारणास्तव रक्तदान करू शकले नाहीत. यामध्ये २ महिला रक्तदात्यांनी रक्तदान केले.
कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते रामदास विखाळे, अमोल भोगले, कणकवली नगरसेविका कविता राणे, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, स्वाती राणे, विनायक उर्फ बाळू मेस्त्री, अनिल खोचरे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.यावेळी कणकसिंधु वस्तीस्तर संघाच्या महिलांनी रक्तदात्यांना रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राखी बांधून अनोखा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तुषार पावसकर, सर्वेश राणे, योगेश जाधव, केतन दळवी, अभिषेक नाडकर्णी, सुशिल परब, माणिक वाघमारे आदींनी प्रयत्न केले.