‘श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग’ व ‘स्वयंभू कला क्रीडा मंडळ आजगांव’ यांच्या संयुक्त विद्यमाने “राधाकृष्ण चषक 2022” या सांगीतिक महोत्सवाचे आयोजन..!!
श्री देव वेतोबा मंदिर सभागृह आजगाव येथे स्पर्धा संपन्न..!!
आजगांव । देवेंद्र गावडे
सोमवार । दि. ३० मे २०२२
“राधाकृष्ण चषक 2022” चे मानकरी ठरलेत शास्त्रीय गायन विभागात रत्नागिरीची कु. रागिणी बाणे तर सवेष नाट्यगीतमध्ये कु. तेजल गावडे व सर्वेश राऊळ.
आपल्या अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताचा आपल्या जिल्ह्यातही प्रचार व प्रसार व्हावा, शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या जिल्ह्यातील युवा साधकांना हक्काचं व्यासपीठ मिळावं, त्यांची कला रसिकांसमोर आणुन त्यांच्या कलागुणांना न्याय द्यावा व त्यांना प्रोत्साहित करावं या पवित्र उद्देशाने ‘श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग’ व ‘स्वयंभू कला क्रीडा मंडळ आजगांव’ यांच्या संयुक्त विद्यमाने “राधाकृष्ण चषक 2022” या सांगीतिक महोत्सवाचे आयोजन श्री देव वेतोबा मंदिर सभागृह आजगाव येथे करण्यात आलं होतं. या अंतर्गत ‘शास्त्रीय गायन(हिंदुस्तानी ख्याल) स्पर्धा’ व ‘सवेष साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा’ घेण्यात आली.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच शनिवार दि. २८ मे २०२२ रोजी सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा मर्यादीत ʼशास्त्रीय गायन(हिंदुस्थानी ख्याल) स्पर्धाʼ संपन्न झाली. या दिवशीच्या कार्यक्रमाचे उद्घाटन स्वामी गगनगिरी महाराज आश्रम, गगनगड, कोल्हापूरचे विश्वस्त श्री संजयदादा पाटणकर, सावंतवाडी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेशजी राऊळ, पुणे येथील ज्येष्ठ शास्त्रीय गायिका श्रीम. अनुराधा कुबेर मॅडम, राधाकृष्णा संगीत साधनाच्या अध्यक्षा सौ.वीणा दळवी, स्वयंभू कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्री अण्णा झांट्ये आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. या ‘शास्त्रीय गायन(हिंदुस्तानी ख्याल)’ विभागात प्रथम पारितोषिक रोख ₹ ५५०१/- व ‘राधाकृष्ण चषक’ची मानकरी ठरली खेडशी, रत्नागिरीची कु. रागिणी तानाजी बाणे. द्वितीय पारितोषिक रोख ₹ ३५०१/- व सन्मानचिन्हची विजेती ठरली सावंतवाडीची कु. विधिता वैभव केंकरे. तृतीय पारितोषिक ₹ २५०१/- व सन्मानचिन्हचा विजेता ठरला अणसूर वेंगुर्लेचा हर्षल सगुण मेस्त्री. उत्तेजनार्थ प्रथम ₹१५०१/- सावंतवाडीची कु. देवयानी केसरकर तर उत्तेजनार्थ द्वितीय ₹११०१/-ची विजेती ठरली शिरोडा वेंगुर्लेची कु. निधी श्रीकांत जोशी. शास्त्रीय संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व व भेंडीबाजार घराण्याच्या ख्यातनाम गायिका, पुणे येथील श्रीम. अनुराधा कुबेर मॅडम यांनी या स्पर्धेचं परीक्षण केलं. यावेळी स्पर्धक व सर्व संगीत साधकांना मार्गदर्शक अशी त्यांची प्रकट मुलाखत निवेदक श्री संजय कात्रे सर यांच्या माध्यमातून घेण्यात आली.
या सांगीतिक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार दि. २९ मे २०२२ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित “सवेष साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा” छोटा गट व मोठा गट अशी दोन गटात घेण्यात आली. या दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सन्मा. श्री मनीषजी दळवी, संगीतरत्न श्री भालचंद्र केळुस्कर बुवा, मळेवाड सरपंच श्री हेमंत मराठे, ज्येष्ठ रंगकर्मी वसंत उर्फ भाऊ साळगावकर आदी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आलं. या सवेष नाट्यगीत गायन विभागात छोट्या गटातून प्रथम पारितोषिक रोख ₹ ३३३३/- व ‘राधाकृष्ण चषक’ ची मानकरी ठरली आसोली फणसखोल गावची कु. तेजल रविंद्र गावडे, द्वितीय पारितोषिक रोख ₹ २२२२/- व सन्मानचिन्ह कु. निधी श्रीकांत जोशी(शिरोडा), तृतीय पारितोषिक रोख ₹ ११११/- व सन्मानचिन्ह विजेती ठरली खारेपाटणची कु. प्राजक्ता अभय ठाकूरदेसाई. उत्तेजनार्थ पारितोषिक ₹५०१/-ची विजेती ठरली आजगांवची कु. अदिती अवधूत राजाध्यक्ष. ‘सवेष साभिनय नाट्यगीत’ मोठ्या गटातून प्रथम पारितोषिक रोख ₹ ५५५५/- व ‘राधाकृष्ण चषक’ चा मानकरी ठरला कोलगांव, सावंतवाडीचा सर्वेश कृष्णा राऊळ. द्वितीय पारितोषिक रोख ₹ ३३३३ व सन्मानचिन्ह विजेती सावंतवाडीची कु. केतकी सोमा सावंत, तर तृतीय पारितोषिक रोख ₹२२२२/- व सन्मानचिन्हची विजेती ठरली मळगांव सावंतवाडीची कु. वर्षा वैजनाथ देवण. सातोसे गावचा कौस्तुभ संतोष धुरी उत्तेजनार्थ पारितोषिक ₹१००१ चा विजेता ठरला. गोवा येथील ज्येष्ठ संगीततज्ञ श्री संजय धुपकर व श्री केशव पणशीकर यांनी या स्पर्धेचे परीक्षण केलं. कार्यक्रमाचा पारितोषिक वितरण सोहळा अर्चना फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ अर्चना घारे-परब, शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री एकनाथ नारोजी, ज्येष्ठ कीर्तनकार डाॅ. श्रीराम दीक्षित, डॉ. विलास गावडे, राधाकृष्ण संगीत साधनाच्या अध्यक्षा सौ.वीणा दळवी, स्वयंभू कला क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष श्री सुनील वाडकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं. स्पर्धेसाठी स्पर्धकांना संगीत साथ, हार्मोनियम श्री अमित मेस्त्री, मंगेश मेस्त्री, साहिल घुबे यांनी तर तबला साथ गोवा येथील साईश दलाल, श्री प्रसाद मेस्त्री, श्री दत्ताराम सावंत यांनी केली. दोन्ही दिवसाच्या संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय कात्रे सर यांनी केलं. यावेळी “राधाकृष्ण चषक 2022” हा सांगीतिक महोत्सव यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व देणगीदार, पारितोषिकांचे सर्व प्रायोजक, कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असणारे विविध क्षेत्रातील मान्यवर, सर्व सहभागी स्पर्धक, उपस्थित सर्व संगीत प्रेमी, स्पर्धेचे मान्यवर परीक्षक, श्री वेतोबा देवस्थानचे सर्व मानकरी, दोन्ही मंडळांचे सर्व सदस्य, श्री राधाकृष्ण संगीत साधनाचे सर्व विद्यार्थी व पालक वर्ग या सर्वांचे ‘श्री राधाकृष्ण संगीत साधना’च्या अध्यक्षा सौ. वीणा दळवी यांनी आभार मानले.