27 C
Mālvan
Friday, October 18, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

भाजपा वाढीसाठी कोकण व मुंबई यामध्ये समन्वयकाची भूमिका बजावणार-डाॅ. सुभाष आरोसकर.

- Advertisement -
- Advertisement -

भाजपा वेंगुर्ले च्या वतीने तालुका कार्यालयात डाॅ. सुभाष आरोसकर यांचा सत्कार.

चिंदर | विवेक परब :
वेंगुर्ले तालुक्यातील, तुळस गावचे मुळचे रहिवासी असलेले व भाजपाचे कोकण विकास आघाडी, मुंबईचे उपाध्यक्ष डाॅ. सुभाष आरोसकर यांनी तालुका कार्यालयात भेट दिली असता, तालुक्याच्या वतीने प्रदेश कार्यकारणी सदस्य शरदजी चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना डाॅ. सुभाष आरोसकर म्हणाले, की देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या कार्यकर्तृत्वावर भारावून जाऊन मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. जीवन विद्या मिशन या सेवाभावी संस्थेत गेली २५ ते ३० वर्षे नामधारक म्हणून काम करत असताना सद्गुरू वामनराव पै माऊली’ व त्यांचे चिरंजीव प्रल्हाद दादा पै यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवेचे व्रत हाती घेतले आहे.याच कार्याचा वसा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पण काम करत असल्याने आपणही भाजपा मध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.
तसेच भविष्यात कोकण मधील ग्रामीण भागातील समस्या सोडवण्यासाठी कोकण व मुंबई मधील समन्वयकाचे काम आपण कोकण विकास आघाडी चे अध्यक्ष, सुहासजी आडीवरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करणार असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, नगराध्यक्ष राजन गीरप, जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके, जिल्हा का.का.सदस्य वसंत तांडेल, महिला तालुकाध्यक्षा स्मिता दामले, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, माजी नगराध्यक्षा डाॅ. पूजा कर्पे, नगरसेविका श्रेया मयेकर व ईशा मोंडकर, महिला मोर्चाच्या वृंदा गवडंळकर व रसिका मठकर, युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर व समीर नाईक , शक्तीकेंद्र प्रमुख संतोष शेटकर, ता.का.का.सदस्य रवींद्र शिरसाट, बुथप्रमुख शेखर काणेकर व नितीश कुडतरकर, दिगंबर आरोसकर व ओंकार चव्हाण इत्यादी उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

भाजपा वेंगुर्ले च्या वतीने तालुका कार्यालयात डाॅ. सुभाष आरोसकर यांचा सत्कार.

चिंदर | विवेक परब :
वेंगुर्ले तालुक्यातील, तुळस गावचे मुळचे रहिवासी असलेले व भाजपाचे कोकण विकास आघाडी, मुंबईचे उपाध्यक्ष डाॅ. सुभाष आरोसकर यांनी तालुका कार्यालयात भेट दिली असता, तालुक्याच्या वतीने प्रदेश कार्यकारणी सदस्य शरदजी चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना डाॅ. सुभाष आरोसकर म्हणाले, की देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या कार्यकर्तृत्वावर भारावून जाऊन मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. जीवन विद्या मिशन या सेवाभावी संस्थेत गेली २५ ते ३० वर्षे नामधारक म्हणून काम करत असताना सद्गुरू वामनराव पै माऊली' व त्यांचे चिरंजीव प्रल्हाद दादा पै यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवेचे व्रत हाती घेतले आहे.याच कार्याचा वसा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पण काम करत असल्याने आपणही भाजपा मध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.
तसेच भविष्यात कोकण मधील ग्रामीण भागातील समस्या सोडवण्यासाठी कोकण व मुंबई मधील समन्वयकाचे काम आपण कोकण विकास आघाडी चे अध्यक्ष, सुहासजी आडीवरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करणार असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, नगराध्यक्ष राजन गीरप, जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके, जिल्हा का.का.सदस्य वसंत तांडेल, महिला तालुकाध्यक्षा स्मिता दामले, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, माजी नगराध्यक्षा डाॅ. पूजा कर्पे, नगरसेविका श्रेया मयेकर व ईशा मोंडकर, महिला मोर्चाच्या वृंदा गवडंळकर व रसिका मठकर, युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर व समीर नाईक , शक्तीकेंद्र प्रमुख संतोष शेटकर, ता.का.का.सदस्य रवींद्र शिरसाट, बुथप्रमुख शेखर काणेकर व नितीश कुडतरकर, दिगंबर आरोसकर व ओंकार चव्हाण इत्यादी उपस्थित होते.

error: Content is protected !!