ऑस्ट्रेलियाती एलिस नदी पुलाजवळ झाला कारला अपघात.
मालवण | सुयोग पंडित : ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात शनिवारी रात्री मृत्यू झाला. अँड्र्यू सायमंड्सचे वयाच्या अवघ्या 46 व्या वर्षी निधन जाल्याने क्रिकेट जगतात हळहळ व्यक्त होत आहे.
अँड्र्यू सायमंड्सच्या कारला शनिवारी रात्री 10.30 च्या सुमारास टाऊन्सविलेच्या पश्चिमेला 50 किमी अंतरावर असलेल्या हर्वे रेंजमध्ये परिसरात अपघात झाला . झालेला भीषण अपघाता एवढा भीषण होता की इस्पितळात हलवतानाच सायमंड्सचे निधन झाले. जखमी झालेल्या ऑस्ट्रेलियन डॉक्टरांनी वाचवण्याचा पुर्णपणे प्रयत्न देखील केला आहे. अपघात झाल्यानंतर अँड्र्यूला जवळच्या रूग्णालयात ज्यावेळी दाखल केले त्यावेळी त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक होती. अँड्र्यू सायमंड्स यांच्या निधनानंतर संपुर्ण क्रिकेट विश्वात आणि त्याच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ॲलन बॉर्डरने सायमंड्स यांना श्रद्धांजली वाहिली. नाईन नेटवर्कशी बोलताना ते म्हणाले की, त्याला चेंडू उंच व दूर टोलवत खेळायला करायला आवडायचे. तो पारंपारिक शैलीचा पण घणाघाती पद्धतीचा क्रिकेटपटू होता. अलिकडच्या काळात, सायमंड्सने फॉक्स स्पोर्ट्ससाठी टीव्ही समालोचक म्हणून काम केले. तसेच बिग बॅश लीगच्या प्रसारणासाठी मायक्रोफोनवर नियमितपणे काम केले आहे. सायमंड्सने ऑस्ट्रेलियासाठी 26 कसोटी, 198 वनडे आणि 14 टी-20 सामने खेळले. यादरम्यान त्याच्या बॅटने अनुक्रमे 1462, 5088 आणि 337 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 165 विकेट घेतल्या आहेत. सायमंड्स त्याच्या आक्रमक आतून आणि मैदानावरील उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठीही ओळखला जात असे.
ऑस्ट्रेलियासाठी 198 दिवसीय सामने खेळले
ऑस्ट्रेलियासाठी 198 दिवसीय सामने खेळलेला सायमंड्स 2003 च्या विश्वचषक संघाचाही भाग होता. त्या दोन वर्षांत पाँटिंगच्या नेतृत्वाखाली कांगारू संघाने एकही सामना न गमावता जेतेपदे पटकावली होती.
2008 सालच्या हरभजनशी झालेल्या मंकी गेट प्रकारानंतर भारतीय चाहत्यांचे मन दुखावणारा ॲन्ड्र्यू सायमंड्स
आय पी एल मध्ये सुरवातीला डेक्कन चार्जर्सकडून खेळला. सायमंड्स जेंव्हा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील झाला तेंव्हापासून भारतीय चाहते व मुंबई इंडियन्सचे चाहत्यांनी सायमंड्स कडे अत्यंत सकारात्मक पद्धतीने पाहिले आहे .
‘बिग बाॅस’ या कलर्स वाहिनी वरील शो मध्येसुद्धा तो पाहुणा स्पर्धक म्हणून आलेला तेंव्हा सायमंड्सची सामाजिक धर्मादाय करायचे एक जीवन अंग सामान्य क्रिकेट रसिकांना समजले होते.
सायमंड्सच्या आकाली निधनाने क्वीन्सलॅन्ड व इंग्लंडमधील त्याच्या मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे.