24.6 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

सामान्य युवकांच्या राजकीय भिडस्तपणाने झाकलेले ‘बंद दार’ उघडणारे मंदार केणी…!

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | विशेष : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या खुद्द मालवण शहरात ‘राजकारण’ ही गोष्ट ठरवली तर सामान्य बालपण गेलेले युवकही साध्य करु शकतात हे मंदार केणींनी सिद्ध केले.

साल 2005 पर्यंत राजकीय भिडस्तपणामुळे मालवण तालुक्यातील व शहरातील बहुतांश युवकांना राजकारणात उतरण्यासाठी वय,व्यावसायिक यश आणि इतर गोष्टींच्या भीतीच्या बागुलबुवावर मंदार केणींनी मात केली .

राजकीय अभ्यासाची दारे बंद का असतात याचा दृष्टी आड सृष्टी असा विचार न करता ते दार उघडण्यासाठी युवा वय किंवा सामाजिक अनुभवाची कमतरता या अटींची गरजच नसते हे मंदार केणींनी दाखवून दिले.

जे जे झाकून राहीले होते ते ते एक दार उघडत गेल्यावर मंदार केणी या युवकाचा नगरसेवक झाला..व पुढे नगरपरिषदेचा बांधकाम सभापतीही.

आपला रोजचा घरचा जेवणाचा डबा आपल्यासोबत घेऊन घराबाहेर पडणारे काही राजकीय माणसं असतात त्यातील मंदार केणी एक आहेत. प्रोफेशनल किंवा राजकीय कारकिर्द घडवताना स्वतःचे मनःस्थिती स्थैर्य व तब्येतीचे गांभिर्य जपणे ही राजकारणाची व स्विकारलेल्या जबाबादारीचाच भाग असतो हे मंदार यांना कळले आहे.
स्वतःला प्रसन्न व माफक रुबाबदार राखले तरच समस्यांचे निराकरण करण्यासाठी स्वतःसकट आसपास सर्वांनाच हुरुप येतो हे मंदारना पटले आणि त्याच रुबाबदारपणे त्यांनी अनेक सामाजिक बांधिलकीची कामेही सहकार्यांसोबत येत मार्गी लावली.
प्रसंगी त्यांच्या व त्यांच्या सहकारार्यांच्या प्रसन्नतेवर टीकाही झाली पण सामाजिक बांधिलकीचा व स्वतःच्या उद्देशांचा चमकदार गाॅगल दृष्टिवर असल्यामुळे त्यांनी व सहकार्यांनी स्वतःचा तो सामाजिक दृष्टीसाठी आवश्यक व संरक्षक गाॅगल नजरेसमोरुन उतरु दिला नाही.
माजी बांधकाम सभापती व माजी नगरसेवक मंदार केणी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | विशेष : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या खुद्द मालवण शहरात 'राजकारण' ही गोष्ट ठरवली तर सामान्य बालपण गेलेले युवकही साध्य करु शकतात हे मंदार केणींनी सिद्ध केले.

साल 2005 पर्यंत राजकीय भिडस्तपणामुळे मालवण तालुक्यातील व शहरातील बहुतांश युवकांना राजकारणात उतरण्यासाठी वय,व्यावसायिक यश आणि इतर गोष्टींच्या भीतीच्या बागुलबुवावर मंदार केणींनी मात केली .

राजकीय अभ्यासाची दारे बंद का असतात याचा दृष्टी आड सृष्टी असा विचार न करता ते दार उघडण्यासाठी युवा वय किंवा सामाजिक अनुभवाची कमतरता या अटींची गरजच नसते हे मंदार केणींनी दाखवून दिले.

जे जे झाकून राहीले होते ते ते एक दार उघडत गेल्यावर मंदार केणी या युवकाचा नगरसेवक झाला..व पुढे नगरपरिषदेचा बांधकाम सभापतीही.

आपला रोजचा घरचा जेवणाचा डबा आपल्यासोबत घेऊन घराबाहेर पडणारे काही राजकीय माणसं असतात त्यातील मंदार केणी एक आहेत. प्रोफेशनल किंवा राजकीय कारकिर्द घडवताना स्वतःचे मनःस्थिती स्थैर्य व तब्येतीचे गांभिर्य जपणे ही राजकारणाची व स्विकारलेल्या जबाबादारीचाच भाग असतो हे मंदार यांना कळले आहे.
स्वतःला प्रसन्न व माफक रुबाबदार राखले तरच समस्यांचे निराकरण करण्यासाठी स्वतःसकट आसपास सर्वांनाच हुरुप येतो हे मंदारना पटले आणि त्याच रुबाबदारपणे त्यांनी अनेक सामाजिक बांधिलकीची कामेही सहकार्यांसोबत येत मार्गी लावली.
प्रसंगी त्यांच्या व त्यांच्या सहकारार्यांच्या प्रसन्नतेवर टीकाही झाली पण सामाजिक बांधिलकीचा व स्वतःच्या उद्देशांचा चमकदार गाॅगल दृष्टिवर असल्यामुळे त्यांनी व सहकार्यांनी स्वतःचा तो सामाजिक दृष्टीसाठी आवश्यक व संरक्षक गाॅगल नजरेसमोरुन उतरु दिला नाही.
माजी बांधकाम सभापती व माजी नगरसेवक मंदार केणी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

error: Content is protected !!