24.6 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

मुंबई इंडियन्सचा गुजरात टायटन्सवर सनसनाटी विजय..!

- Advertisement -
- Advertisement -

डॅनियल सॅम्सचे शेवटचे षटक ठरले प्रभावी ;टीम डेवीड ठरला सामनावीर

क्रिडावृत्त | सुयोग पंडित : आय पि एल 2022 मध्ये अत्यंत निराशाजनक कामगिरी करुन आधीच स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलेल्या मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सवर सनसनाटी विजय मिळवला.

अशा प्रकारे पहिले सलग आठ सामने हरणार्या मुंबईचा हा सलग दुसरा विजय चाहत्यांसाठी सुखद ठरला.

प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने इशान किशन 45,टीम डेवीड 44 व कर्णधार रोहीत शर्माच्या 43 धावांच्या जोरावर6 बाद 177 धावा केल्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना संपूर्ण सामना गुजरातच्या नियंत्रणाखाली होता. परंतु शेवटच्या षटकात 09 धावा हव्या असताना मुंबईचा ‘परदेशी’ गोलंदाज डॅनीअल सॅम्सने प्रभावी मारा करत केवळ तीनच धावा दिल्या. किलर फलंदाज डेवीड मिलरला दोन चेंडूत 6 धावा हव्या असताना त्याने शेवटच्या दोन चेंडूंवर जबरदस्त चकवा देत दोन्ही चेंडू निर्धाव टाकले.
अखेर गुजरातचा संघ5 गडी बाद 172 धावाच करु शकला. टीम डेवीडला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

(सौजन्य : मुंबई इंडियन्स इन्स्टाग्राम आणि स्टार स्पोर्टस् )

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

डॅनियल सॅम्सचे शेवटचे षटक ठरले प्रभावी ;टीम डेवीड ठरला सामनावीर

क्रिडावृत्त | सुयोग पंडित : आय पि एल 2022 मध्ये अत्यंत निराशाजनक कामगिरी करुन आधीच स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलेल्या मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सवर सनसनाटी विजय मिळवला.

अशा प्रकारे पहिले सलग आठ सामने हरणार्या मुंबईचा हा सलग दुसरा विजय चाहत्यांसाठी सुखद ठरला.

प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने इशान किशन 45,टीम डेवीड 44 व कर्णधार रोहीत शर्माच्या 43 धावांच्या जोरावर6 बाद 177 धावा केल्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना संपूर्ण सामना गुजरातच्या नियंत्रणाखाली होता. परंतु शेवटच्या षटकात 09 धावा हव्या असताना मुंबईचा 'परदेशी' गोलंदाज डॅनीअल सॅम्सने प्रभावी मारा करत केवळ तीनच धावा दिल्या. किलर फलंदाज डेवीड मिलरला दोन चेंडूत 6 धावा हव्या असताना त्याने शेवटच्या दोन चेंडूंवर जबरदस्त चकवा देत दोन्ही चेंडू निर्धाव टाकले.
अखेर गुजरातचा संघ5 गडी बाद 172 धावाच करु शकला. टीम डेवीडला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

(सौजन्य : मुंबई इंडियन्स इन्स्टाग्राम आणि स्टार स्पोर्टस् )

error: Content is protected !!