मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मुणगे गावची ग्रामदेवता श्री भगवती देवीच्या गाभाऱ्यात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आंबा बागायतदारांनी देवीला अर्पण केलेले २९ डझन हापूस आंबे वापरून आंब्याची आरास करण्यात आली.
जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व आंबा बागायतदार प्रदीप परुळेकर यांनी याबाबत देवस्थानच्या परवानगीने आंबा बागायतदारांना आंबे देण्याचे आवाहन केले होते. सदर आम्रपूजा पाहण्यासाठी ग्रामस्थ तसेच भाविकांनी एकच गर्दी केली होती.
देवी चरणी फळांचा राजा समर्पित होताना उपस्थित सर्वांच्याच चेहर्यावर एक वेगळा आम्र आनंद होता.