चौके | अमोल गोसावी : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा या प्रशालेत प्लेट पेंटिंग प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले .या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी पोफळीच्या सालापासून तयार करण्यात आलेल्या डिनर प्लेटवर अक्रेलिक कलरच्या साहाय्याने सुंदर चित्रे काढली, त्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातील विविध पक्षी ,लघुचित्रशैलीतील काही चित्रे देखावे अशा विविध कलाकृती रेखाटून या प्लेट अधिक आकर्षक बनवल्या .


इयत्ता सातवी ,आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी या कलाकृती बनवल्या .यासाठी कलाशिक्षक श्री समीर चांदरकर यांनी मार्गदर्शन केले .







कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव श्रीमती विजयश्री देसाई तसेच सचिव श्री सुनील नाईक बॅरिस्टर नाथ पै सेवांगण शाखा कट्टा चे कार्याध्यक्ष श्री दीपक भोगटे यांनी प्रदर्शनाचे उद्घाटन केले .तसेच कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय अजयराज वराडकर व सर्व संचालक मंडळ यांनी या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या .प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय एन. के .कांबळे ,सर ज्येष्ठ शिक्षक संजय नाईक सर ,वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल चे मुख्याध्यापक श्री.नाईक डॉ. दादासाहेब कला व वाणिज्य महाविद्यालय प्राचार्य जमदाडे सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांची प्रशंसा केली.
