रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने तायक्वांदो ॲकॅडमी, राजापुर आयोजित 15 वी रत्नागिरी जिल्हा कयुरोगी आणि 9 वी पुमसे ओपन चॅलेंज स्पर्धा…
मालवण | सुयोग पंडित : राजापूर साखरपा लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डाॅ.राजन साळवी यांनी रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने तायक्वांदो अकॅडमी, राजापुर आयोजित आयोजित 15 व्या रत्नागिरी जिल्हा कयुरोगी आणि 9 वी पुमसे ओपन चॅलेंज स्पर्धेला भेट दिली. यावेळी राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजन साळवी यांच्या हस्ते केतकी महेश चिगरे हिला सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.
त्यावेळी स्पर्धेमध्ये विविध गटात प्रथम, द्वितीय, तृतीय प्राविण्य मिळवलेल्या खेळाडूंना विविध फेरीमध्ये प्राविण्य मिळवलेल्या खेळाडूंनाही विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजन साळवी ह्यांच्या हस्ते मेडल देण्यात आले.
त्याप्रसंगी आयोजक, प्रशिक्षक यांनी स्पर्धेसाठी केलेली लेसर किटची मागणी मतदारसंघाचे आमदार डॉ. राजन साळवी ह्यांनी तात्काळ मान्य करत 9 लाखाचे किट येत्या काही दिवसात देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, शहरप्रमुख संजय पवार, विभागप्रमुख संतोष हातणकर, तायक्वांदो अकॅडमी चे जिल्हाध्यक्ष व्यंकटेशराव कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, राजापूर तायक्वांदो अकॅडमी अध्यक्ष अभिजित तेली, चिपळूण तालुका तायको सचिव प्रवीण कुमार आवळे, खेड प्रशांत कांबळे ,मकेश मयेकर, संदीप राऊत, इतर खेळाडू व मान्यवर उपस्थित होते.
कु. केतकीच्या यशाबद्दल तिचे प्रशिक्षक,पालक यांचीही सर्व स्तरातून प्रशंसा होत आहे.