23 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

हिंदळेत उद्यापासून दोन दिवस रंगणार शिवसेना पुरस्कृत ‘कोकणचा डान्सिंग सुपरस्टार 2022’ इव्हेंट..!

- Advertisement -
- Advertisement -

समृद्धी महिला उद्योग देवगड यांचे भव्य आयोजन..!

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या हिंदळे – मोर्वे येथे ‘ कोकणचा डान्सिंग सुपरस्टार 2022 ही सोलो व गृप नृत्य स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे.
समृद्धी महिला उद्योग देवगड आयोजीत व शिवसेना देवगड प्रायोजीत या स्पर्धेसाठी काॅमेडी क्वीन चेतना भट सह काॅमेडी किंग अरुण कदम, अभिनेता श्याम रजपूत,घनःश्याम गांवकर,रात्रीस खेळ चाले फेम मंगल राणे,अप्सरा आली फेम ॠतुजा राणे,अभिनेता व दिग्दर्शक प्रशांत नेमण आणि विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर तथा अनेक सेलिब्रेटिज उपस्थित रहाणार आहेत.

‘समृद्धी महिला गृह उद्योग’ ही एक महीलांसाठीची संस्था असुन गेली 4 वर्षे त्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम होत आहे.या संस्थेच्या माध्यमातून काही गरजू महिला भगिनींना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. ही संस्था कोरोना महामारी नंतर पुन्हा एकदा नव्याने आपली सुरवात एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने म्हणजे दिनांक १ व २ मे २०२२ रोजी होणाऱ्या”कोकणचा डान्सिंग सुपरस्टार” या कार्यक्रमाच्या माध्यमातून करत आहे.यासाठी काही दानशुर व्यावसायिक संस्थानी सहकार्य केले आहे….व यापुढेही ते अपेक्षीत आहे कारण समाजातील सक्षम स्त्रियांचा आकडा वाढला तरच कौटुंबिक,सामाजिक व देशाचे भविष्य आणखी उज्वल होऊन टिकेल अशी संस्थेची धारणा आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोकणातील कलाकारांना प्रोत्साहन देण्याचाही सर्वतोपरी प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून,कोकणातून व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जास्तीतजास्त लोकांनी या उपक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ,कार्यक्रमांचा आष्वाद घ्यावा व आपणास जमेल ती मदत देखील करावी असे विनम्र आवाहन ‘समृद्धी महिला गृह उद्योग’ च्या अध्यक्षा आर.यु.तारी यांनी केले आहे.

दिनांक 1 आणि 2 मे दिवशी रंगणार्या या महोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांस्कृतिक,सामाजिक,साहित्यिक,औद्योगिक क्रिडा व सर्वच क्षेत्रातील मान्यवरांच्या स्वागतासाठी हिंदळे मोर्वे येथे ‘समृद्धी महिला गृह उद्योग’ अत्यंत अगत्याने सज्ज असल्याचेही संस्थेच्या सदस्यांनी व आयोजकांनी सांगितले आहे.

उद्या दिनांक 1 मे ला सायंकाळी 8 वाजता या दोन दिवशीय इव्हेंटचे उद्घाटन होणार असून सोलो व गृप डान्स स्पर्धेची सुरवात होणार आहे तर 2 मे दिवशी सेलिब्रिटी स्किट, मान्यवरांचा सत्कार व महाअंतिम फेरी रंगणार आहे.

या सोहळ्यासाठी हिंदळे गांव व देवगड तालुका सज्ज झाला आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

समृद्धी महिला उद्योग देवगड यांचे भव्य आयोजन..!

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या हिंदळे - मोर्वे येथे ' कोकणचा डान्सिंग सुपरस्टार 2022 ही सोलो व गृप नृत्य स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे.
समृद्धी महिला उद्योग देवगड आयोजीत व शिवसेना देवगड प्रायोजीत या स्पर्धेसाठी काॅमेडी क्वीन चेतना भट सह काॅमेडी किंग अरुण कदम, अभिनेता श्याम रजपूत,घनःश्याम गांवकर,रात्रीस खेळ चाले फेम मंगल राणे,अप्सरा आली फेम ॠतुजा राणे,अभिनेता व दिग्दर्शक प्रशांत नेमण आणि विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर तथा अनेक सेलिब्रेटिज उपस्थित रहाणार आहेत.

'समृद्धी महिला गृह उद्योग' ही एक महीलांसाठीची संस्था असुन गेली 4 वर्षे त्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम होत आहे.या संस्थेच्या माध्यमातून काही गरजू महिला भगिनींना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. ही संस्था कोरोना महामारी नंतर पुन्हा एकदा नव्याने आपली सुरवात एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने म्हणजे दिनांक १ व २ मे २०२२ रोजी होणाऱ्या"कोकणचा डान्सिंग सुपरस्टार" या कार्यक्रमाच्या माध्यमातून करत आहे.यासाठी काही दानशुर व्यावसायिक संस्थानी सहकार्य केले आहे….व यापुढेही ते अपेक्षीत आहे कारण समाजातील सक्षम स्त्रियांचा आकडा वाढला तरच कौटुंबिक,सामाजिक व देशाचे भविष्य आणखी उज्वल होऊन टिकेल अशी संस्थेची धारणा आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोकणातील कलाकारांना प्रोत्साहन देण्याचाही सर्वतोपरी प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून,कोकणातून व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जास्तीतजास्त लोकांनी या उपक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ,कार्यक्रमांचा आष्वाद घ्यावा व आपणास जमेल ती मदत देखील करावी असे विनम्र आवाहन 'समृद्धी महिला गृह उद्योग' च्या अध्यक्षा आर.यु.तारी यांनी केले आहे.

दिनांक 1 आणि 2 मे दिवशी रंगणार्या या महोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांस्कृतिक,सामाजिक,साहित्यिक,औद्योगिक क्रिडा व सर्वच क्षेत्रातील मान्यवरांच्या स्वागतासाठी हिंदळे मोर्वे येथे 'समृद्धी महिला गृह उद्योग' अत्यंत अगत्याने सज्ज असल्याचेही संस्थेच्या सदस्यांनी व आयोजकांनी सांगितले आहे.

उद्या दिनांक 1 मे ला सायंकाळी 8 वाजता या दोन दिवशीय इव्हेंटचे उद्घाटन होणार असून सोलो व गृप डान्स स्पर्धेची सुरवात होणार आहे तर 2 मे दिवशी सेलिब्रिटी स्किट, मान्यवरांचा सत्कार व महाअंतिम फेरी रंगणार आहे.

या सोहळ्यासाठी हिंदळे गांव व देवगड तालुका सज्ज झाला आहे.

error: Content is protected !!