24.6 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

कास सोसायटीवर भाजप पुरस्कृत पॅनल बिनविरोध विजयी..!

- Advertisement -
- Advertisement -

बांदा | राकेश परब : सावंतवाडी तालुक्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कास सहकारी सोसायटीवर भाजप पुरस्कृत पॅनल बिनविरोध विजयी झाले आहे. अकराही जागेवर भाजप पुरस्कृत पॅनलचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मनिष दळवी यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.

कास सोसायटीच्या संचालक पदाच्या ११ जागांसाठी भाजप पुरस्कृत पॅनलने सर्व जागांवर उमेदवार उभे केले होते. महाविकास आघाडीला याठिकाणी उमेदवार देणेही शक्य न झाल्याने नाचक्की झाली. छाननी दरम्यान भाजपच्या सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याने आपोआपच त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. विजयी उमेदवारांमध्ये सत्यवान बळीराम पंडित, बाबुराव परशुराम पंडित, विश्वनाथ सखाराम पंडित, गजानन नारायण पंडित, अंकुश नारायण किनळेकर, संतोष शंजर कळंगुटकर, बाबी सिताराम हरीजन, वसंत गोविंद पंडित, विश्वनाथ शांताराम राणे, शर्मिला शंकर पंडित व स्मिता सत्यवान तारी यांचा समावेश आहे.

सर्व विजयी उमेदवारांचे जिल्हा बँक चेअरमन मनिष दळवी, संचालक महेश सारंग, गजानन गावडे, माजी संचालक गुरुनाथ पेडणेकर यांनी अभिनंदन केले. यावेळी भाजपा बांदा मंडल तालुकाध्यक्ष महेश धुरी, सरचिटणीस मधुकर देसाई, डेगवे सोसायटी चेअरमन प्रविण देसाई, निगुडे माजी सरपंच आत्माराम गावडे आदी उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बांदा | राकेश परब : सावंतवाडी तालुक्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कास सहकारी सोसायटीवर भाजप पुरस्कृत पॅनल बिनविरोध विजयी झाले आहे. अकराही जागेवर भाजप पुरस्कृत पॅनलचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मनिष दळवी यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.

कास सोसायटीच्या संचालक पदाच्या ११ जागांसाठी भाजप पुरस्कृत पॅनलने सर्व जागांवर उमेदवार उभे केले होते. महाविकास आघाडीला याठिकाणी उमेदवार देणेही शक्य न झाल्याने नाचक्की झाली. छाननी दरम्यान भाजपच्या सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याने आपोआपच त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. विजयी उमेदवारांमध्ये सत्यवान बळीराम पंडित, बाबुराव परशुराम पंडित, विश्वनाथ सखाराम पंडित, गजानन नारायण पंडित, अंकुश नारायण किनळेकर, संतोष शंजर कळंगुटकर, बाबी सिताराम हरीजन, वसंत गोविंद पंडित, विश्वनाथ शांताराम राणे, शर्मिला शंकर पंडित व स्मिता सत्यवान तारी यांचा समावेश आहे.

सर्व विजयी उमेदवारांचे जिल्हा बँक चेअरमन मनिष दळवी, संचालक महेश सारंग, गजानन गावडे, माजी संचालक गुरुनाथ पेडणेकर यांनी अभिनंदन केले. यावेळी भाजपा बांदा मंडल तालुकाध्यक्ष महेश धुरी, सरचिटणीस मधुकर देसाई, डेगवे सोसायटी चेअरमन प्रविण देसाई, निगुडे माजी सरपंच आत्माराम गावडे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!