27.5 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

पत्रकारितेचा ‘फुल प्रफुल्ल’ पुरावा …! ( विशेष )

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | विशेष : प्रसारमाध्यमांतील साधने विकसीत होत असताना बातमी या प्रकारातील थेट असूनही जपता येणारी तटस्थता म्हणजे मालवणचे ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई.

‘वेदना जाणावयाला जागवू संवेदना’ हे सामाजिक दृष्ट्या बांधिलकीचे आहे हे जाणलेल्या प्रफुल्ल देसाई यांनी त्या वेदनेची भळभळ म्हणजे आपली स्वतःचीच भळभळ असल्याचा दिखावा करुन पत्रकारिता केली नाही. भूमिका घेणे याचा अर्थ ‘पेटवून टाकुया’ असा नसून घडलेल्या घटनेतील व घटकातील निव्वळपणा जपून ती जगासमोर आणायचा प्रयत्न ते करतात.

नि:ष्पक्ष पत्रकारिता हा एक कौशल्याचा भाग असून ती तशी “मी’ करतोय हा दावा करताना आपला “मी” त्यात घुसवून मूळ घटनेला,तत्वाला आणि त्यातील मुद्द्याला दुर्लक्षित करु नये अशी प्रफुल्ल यांची नेहमीच धारणा असते.

मालवणचे कै. श्रीकांत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारितेचे धडे गिरवताना तेच धडे हे अथक गिरवत रहाणे ही गरज ओळखलेला एक अपडेटेट पत्रकार म्हणून ते सर्व पत्रकार बंधूंच्या वयोगटात स्वतःला चपखलपणे सामावून घेतात. पत्रकारितेतील कौशल्य व कला निरुपणात्मक पद्धतीनेही ते समजावून सांगतात तेंव्हा त्यांचे ‘फुल प्रफुल्लित’ होऊन समरसून समजावणे हा त्यांच्या अस्सल पत्रकार आत्म्याचा पुरावा असतो.

भूमिका घेताना ती त्यांनी जरी कोणावर कधीच लादली नसली तरिही ती पत्रकारितेच्या शिक्षणातील एक धडा ठरते. भूमिका घेणे किंवा न घेणे या पेक्षा बातमी मध्ये ‘मी’ येऊ न देणे ही ‘देसाई पत्रकारितेची’ दक्षता ते सहसोबतींना जरुर घ्यायला सांगतात…खरंतर ती विरासत तथा कौटुंबिक मालमत्तेसारखी असूनही ते उत्सुकांना खुलेपणाने वाटतात हे महत्वाचे.
रोज धडपड करणार्या सर्व पत्रकार बांधवांसाठी संघटनात्मक आणि रचनात्मक असे काहीतरी घडून त्यांचे जीवन सुखकर व्हावे ही मनोमन इच्छा ते बाळगतात.
आपल्यापेक्षा लहान व होतकरु पत्रकार बांधवांच्या आवडलेल्या गोष्टी ते अगदी मनमोकळेपणाने सर्वांना सांगतात ते एखाद्या पित्याप्रमाणे अभिमानानेच…अगदी आनंदाने…प्रफुल्लतेने…!

समाजात ‘सगळेच’ आहेत….आणि उगीच त्यांचे न्यायाधीश बनून समिक्षा करणे म्हणजे पत्रकारिता नाही यावर ते ठाम असतात.

प्रचंड वाचन आणि मराठी सांस्कृतिक अभ्यास या सोबतच बोली भाषांमधील छोट्या छोट्या मेख जाणणार्या प्रफुल्ल यांचे वृत्तलेखन वाचणे हाही एक तटस्थ नदीवरचा झगमगता सोहळाच असतो जो वाचकाला सुप्त व दडलेल्या मुद्द्यांचाही परिचय करुन देतो.

‘सखोल विचार….ज्ञान विहार..संयम आणि सारासार’ अशा सामाजिक पातळ्यांवर स्वतःला समतोल ठेवलेल्या या ज्येष्ठ पत्रकार माणसाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल टीम.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | विशेष : प्रसारमाध्यमांतील साधने विकसीत होत असताना बातमी या प्रकारातील थेट असूनही जपता येणारी तटस्थता म्हणजे मालवणचे ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई.

'वेदना जाणावयाला जागवू संवेदना' हे सामाजिक दृष्ट्या बांधिलकीचे आहे हे जाणलेल्या प्रफुल्ल देसाई यांनी त्या वेदनेची भळभळ म्हणजे आपली स्वतःचीच भळभळ असल्याचा दिखावा करुन पत्रकारिता केली नाही. भूमिका घेणे याचा अर्थ 'पेटवून टाकुया' असा नसून घडलेल्या घटनेतील व घटकातील निव्वळपणा जपून ती जगासमोर आणायचा प्रयत्न ते करतात.

नि:ष्पक्ष पत्रकारिता हा एक कौशल्याचा भाग असून ती तशी "मी' करतोय हा दावा करताना आपला "मी" त्यात घुसवून मूळ घटनेला,तत्वाला आणि त्यातील मुद्द्याला दुर्लक्षित करु नये अशी प्रफुल्ल यांची नेहमीच धारणा असते.

मालवणचे कै. श्रीकांत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारितेचे धडे गिरवताना तेच धडे हे अथक गिरवत रहाणे ही गरज ओळखलेला एक अपडेटेट पत्रकार म्हणून ते सर्व पत्रकार बंधूंच्या वयोगटात स्वतःला चपखलपणे सामावून घेतात. पत्रकारितेतील कौशल्य व कला निरुपणात्मक पद्धतीनेही ते समजावून सांगतात तेंव्हा त्यांचे 'फुल प्रफुल्लित' होऊन समरसून समजावणे हा त्यांच्या अस्सल पत्रकार आत्म्याचा पुरावा असतो.

भूमिका घेताना ती त्यांनी जरी कोणावर कधीच लादली नसली तरिही ती पत्रकारितेच्या शिक्षणातील एक धडा ठरते. भूमिका घेणे किंवा न घेणे या पेक्षा बातमी मध्ये 'मी' येऊ न देणे ही 'देसाई पत्रकारितेची' दक्षता ते सहसोबतींना जरुर घ्यायला सांगतात…खरंतर ती विरासत तथा कौटुंबिक मालमत्तेसारखी असूनही ते उत्सुकांना खुलेपणाने वाटतात हे महत्वाचे.
रोज धडपड करणार्या सर्व पत्रकार बांधवांसाठी संघटनात्मक आणि रचनात्मक असे काहीतरी घडून त्यांचे जीवन सुखकर व्हावे ही मनोमन इच्छा ते बाळगतात.
आपल्यापेक्षा लहान व होतकरु पत्रकार बांधवांच्या आवडलेल्या गोष्टी ते अगदी मनमोकळेपणाने सर्वांना सांगतात ते एखाद्या पित्याप्रमाणे अभिमानानेच…अगदी आनंदाने…प्रफुल्लतेने…!

समाजात 'सगळेच' आहेत….आणि उगीच त्यांचे न्यायाधीश बनून समिक्षा करणे म्हणजे पत्रकारिता नाही यावर ते ठाम असतात.

प्रचंड वाचन आणि मराठी सांस्कृतिक अभ्यास या सोबतच बोली भाषांमधील छोट्या छोट्या मेख जाणणार्या प्रफुल्ल यांचे वृत्तलेखन वाचणे हाही एक तटस्थ नदीवरचा झगमगता सोहळाच असतो जो वाचकाला सुप्त व दडलेल्या मुद्द्यांचाही परिचय करुन देतो.

'सखोल विचार….ज्ञान विहार..संयम आणि सारासार' अशा सामाजिक पातळ्यांवर स्वतःला समतोल ठेवलेल्या या ज्येष्ठ पत्रकार माणसाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल टीम.

error: Content is protected !!