रिझ़वान शेख़ यांच्या हस्ते झाले उद्घाटन.
विनर्स स्पोर्टस् मालवण शिरगांव एकॅडमीची कप्तान अनुष्का आंबेरकरने जिंकली नाणेफेक..!
शिरगांव | संतोष साळसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या शहरात टोपीवाला हायस्कूल बोर्डिंग ग्राउंड मैदानावर अंडर सिक्स्टीन स्पर्धेला आज सुरवात झाली.
या स्पर्धेचे उद्घाटन माजी लेदरबाॅल खेळाडू आणि व्यावसायिक रिझ़वान शेख़ यांच्या हस्ते झाले.
या उद्घाटन कार्यक्रमाला रिझ़वान शेख़ यांच्यासोबत प्रमुख मान्यवर म्हणून विनर्स ॲकॅडमी शिरगांवचे संस्थापक व क्रिकेट प्रसारक श्री सुधीर साटम, उद्योजक श्री. कुबल, आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलचे संस्थापक व मुख्य संपादक सुयोग पंडित,क्रिकेट प्रशिक्षक श्री. हेमेंद्र मेस्त, ग्राऊंडस् मन श्री खैरे , प्रशिक्षक श्री.संदीप पेडणेकर व तारकर्ली क्रिकेट क्लबचे पदाधिकारी व क्रिकेट प्रसारक श्री.गोविंद ऊर्फ बंटी केरकर व खेळाडू तसेच पंच उपस्थित होते.
पहिला सामना विनर्स स्पोर्टस् मालवण शिरगांव ॲकॅडमी विरुद्ध टोपीवाला क्रिकेट ॲकॅडॅमी असा सुरु झाला .
विनर्स स्पोर्टस् मालवण शिरगांवची कप्तान अनुष्का आंबेरकरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला असून शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा विनर्स स्पोर्टस् मालवण शिरगांव एकॅडमी संघाची धावसंख्या निर्धारित वीस षचकांपैकी 8 षटकांत 4 गडी बाद 62 अशी होती.
या स्पर्धेला इनसाईड क्रिकेट वाॅटस् अप गृप या समूहाचे प्रायोजकत्व लाभले असून तारकर्ली क्रिकेट क्लबतर्फे याचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्या या स्पर्धेत वेंगुर्ले संघाचेही सामने खेळवले जाणार आहेत.
या स्पर्धेला मालवण शसर व परिसरातील जास्तीतजास्त शाळकरी मुलामुलींनी,पालकांनी,माजी खेळाडुंनी व क्रिकेट प्रेमींनी उपस्थिती दर्शवून लेदरबाॅल क्रिकेटची शिस्त,परंपरा व महत्व जाणावे असे आवाहन उपस्थित मान्यवर व उद्घाटक रिझ़वान शेख़ यांनी केले आहे.