शिंपला बिच रिसाॅर्ट तळाशील ठरले उपविजेते..!
अंतिम सामन्यात लतेश साळगावकरच्या फलंदाजीने केली गोलंदाजीची अक्षरशः कत्तल..!
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे एकेश्वर मित्रमंडळाच्या भव्य गाबीत चषक 2022 स्पर्धेचे विजेतेपद राजाराम वाॅरिअर्स (तळवडे) केरवाडा संघाने पटकावले आहे.
संपूर्ण स्पर्धेत झुंजार कामगिरी करणार्या शिंपला बिच रिसाॅर्ट तळाशील संघाला अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने ते उपविजेते ठरले.
एकूण सोळा संघांनी सहभाग नोंदवलेल्या या टेनीसबाॅल क्रिकेट स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत संघमालक,खेळाडू यांचा समावेश असल्याने या स्पर्धेचे सर्व स्तरावर औत्सुक्य होते.
दर्शन बांदेकर सारखा आंतरराष्ट्रीय खेळाडूंसमवेत संघाचा हिस्सा असणारा खेळाडूही या स्पर्धेचे आकर्षण ठरला.
उपांत्य फेरीचे सामने श्रीकृष्ण देवबाग विरुद्ध राजाराम केरवाडा
शिंपला बीच रिसाॅर्ट तळाशील विरुद्ध श्री स्पोर्टस् देवबाग असे रंगले आणि या सामन्यांमध्ये अनुक्रमे राजाराम वाॅरिअर्स केरवाडा व शिंपला बीच रिसाॅर्ट तळाशिलची सरशी होत ते अंतिम फेरीत पोचले.
अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजाराम वाॅरिअर्स (तळवडे) केरवाडा संघाने गोलंदाजीची अक्षरशः कत्तल करत निर्धारित सहा 113 धावांचा डोंगर उभारला.
यामध्ये लतेश साळगावकर ने अवघ्या 15 चेंडूत 8 षटकारांसह 60 धावा तडकावल्या आणि त्याला सलग पाच षटकारांसह केवळ 9 चेंडूत 39 धावा करणार्या दाजी नाईकचाही धडाका सोबत होता.
इतक्या मोठ्या धावसंख्येतही शिंपला बिच रिसाॅर्ट तळाशीलचा गोलंदाज अवी देवगडकरने दोन षटकांत केवळ 14 धावाच दिल्या हे वैशिष्ट्य ठरले.
114 धावांचे लक्ष्य समोर घेऊन उतरलेल्या शिंपला बीच रिसाॅर्ट तळाशील संघाला पहिल्याच चेंडूवर आयकाॅन खेळाडू आकाश मसुरकरला गमवावे लागल्याने त्यांच्या विजयाच्या आशा सुरवातीलाच कोमेजल्या व नःतर एक एक गडी ठरावीक अंतराने बाद होत गेल्याने त्यांचा संघ केवळ 30 धावाच करु शकला.
दाजी नाईक याला षटकारांसाठी व इतर अनेक बक्षिसे देण्यात आली.
अंतिम सामन्यातील विस्फोटक फलंदाजीबद्दल लतेश साळगावकरला सामनाविराचा बहुमान प्राप्त झाला.
अंतिम सामना जरी एकतर्फी झाला तरी स्पर्धेतील शिंपला बीच रिसाॅर्ट तळाशीलची कामगिरी लक्षवेधी ठरली. अंतिम सामन्यात सर्वात जास्त धावा मोजलेला तळाशीलचा तेजस सादये संपूर्ण स्पर्धेत मात्र सर्वाधिक बळी घेणारा अव्वल गोलंदाज ठरला हाही एक ‘क्रिकेटींग विरोधाभास’ ठरला.
एकेश्वर मित्रमंडळाची झालझुल मैदानावर आयोजीत केलेल्या या अंतिम सामन्यासाठी मान्यवर म्हणून श्री.सारंग, ॲडव्होकेट उल्हास कुलकर्णी,हडी गावचे माजी सरपंच विलास हडकर , उद्योजक रुपेश प्रभू,नारायण रोगे, पत्रकार महेंद्र पराडकर, स्थानिक नगरसेविका सौ. सेजल परब, श्री.सामंत, केरवाडा वाॅरिअर्सचे संघमालक विकास गावडे ,क्रिकेट प्रसारक श्री गोविंद ऊर्फ बंटी केरकर , आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलचे संचालक व ॲन्कर सहिष्णू पंडित आणि मालवण दांडी वरील असंख्य ग्रामस्थ व गाबीत समाज बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते.
अंतिम सामन्यातील पंच म्हणून श्री मंगेश धुरी व श्री दीपक धुरी यांनी काम पाहीले तर गुणलेखन श्री गोविंद ऊर्फ बंटी केरकर यांनी केले.
स्पर्धेचे समालोचन श्री प्रदीप देऊलकर व नाना नाईक या अनुभवी जोडीने केले तर महेंद्र पराडकर यांच्या समयोचित टिपणीने व किश्श्यांनी प्रेक्षकांमध्ये बहार आणली.
या स्पर्धेच्या आयोजन व यशस्वितेसाठी श्री राका रोगे,श्री अन्वय प्रभू ,गाबीत बांधव आणि एकेश्वर क्रिडा मंडळाने अथक मेहनत घेतली .
पत्रकार महेंद्र पराडकर यांनी बक्षिस वितरणाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
दांडीच्या झालझुल मैदानावर झालेल्या या स्पर्धेला संपूर्ण भरघोस प्रतिसाद मिळाला आणि त्यासाठी सहकार्य केलेल्या सर्व स्थानिक नागरिक, पुरस्कर्ते,खेळाडू , पंच ,गुणलेखक ,संघमालक यांचे एकेश्वर मित्रमंडळातर्फे श्री अन्वय प्रभू व श्री राका रोगे यांनी आभार मानले.
अभिनंदन