मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या जि.प.पूर्ण प्राथ.मालवण दांडी शाळेची विद्यार्थीनी कु.विधिशा रामचंद्र कुबलने पाचवी शिष्यवृत्ती मध्ये गुणवत्ता यादीत स्थान मिळवून दैदिप्यमान असे यश संपादन केले.अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ मालवण मार्फत गौरवचिन्ह, सन्मानपत्र देऊन मालवण गटशिक्षणाधिकारी श्री.संजय माने यांच्या शुभहस्ते तिला गौरवण्यात आले.यावेळी पालक सौ.सरोज संदीप लोणे, मार्गदर्शक शिक्षिका सौ.मनिषा ठाकुर ,मार्गदर्शक शिक्षक श्री.रामदास तांबे ,केंद्रप्रमुख श्री.अन्वर शेख ,अ.भा.प्राथ.शिक्षक संघ राज्यसंयुक्त सरचिटणीस श्री.म.ल.देसाई ,राज्य सदस्य श्री.प्रशांत पारकर,जिल्हाध्यक्ष श्री.राजाराम कविटकर,सचिव श्री.बाबाजी झेंडे,कार्याध्यक्ष श्री.मधुसुदन घोडे,श्री.श्रीकृष्ण बागवे,श्री.सुभाष नाटेकर,मालवण तालुकाध्यक्ष श्री.गुरुनाथ ताम्हणकर,सचिव श्री.गणेश सुरवसे,राज्यपुरस्कार प्राप्त पदवीधर शिक्षक श्री.शिवराज सावंत,सौ.पल्लवी राणे,सौ.मयुरी करलकर,सौ.स्मिता परब,सौ.शर्वरी सावंत,सौ.श्रद्धा बागवे,सौ.तेजल ताम्हणकर,श्री.दीपक वेंगुर्लेकर,श्री शेतसंदी,तसेच बहुसंख्य शिक्षक व गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते.दांडी शाळेची विद्यार्थीनी कु.विधिशा कुबल हीने शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत येऊन दैदिप्यमान यश मिळविल्या बद्दल तिची विशेष प्रशंसा करण्यात आली.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -