बांदा | राकेश परब : इन्सुली विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या आज झालेल्या निवडणुकीत भाजपा पुरस्कृत श्री देवी माऊली ग्रामविकास पॅनलने सर्वच्या सर्व जागा ११ जिंकत महाविकास आघाडीच्या पॅनलचा धुव्वा केला. तर महाविकास आघाडीच्या वतीने बिनविरोध आलेल्या भागू पाटील यांनी सुद्धा भाजपात प्रवेश केल्याने संस्थेवर भाजपची एक हाती सत्ता आली आहे. भाजपने एक हाती सत्ता मिळवीत इन्सुली मध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. विजयी सर्व उमेदवारांचे जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांनी उपस्थित राहून अभिनंदन केले.
इन्सुली विविध कार्यकारी सहकारी सेवा या संस्थेची निवडणूक गुरुवारी पार पडली. येथील नुतन माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात मतदान व मतमोजणी घेण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून उर्मिला यादव यांनी काम पाहिले. निवडणुक कार्यक्रम जाहीर होताच महाविकास आघाडी व भाजपने हि निवडणूक प्रतिष्ठेचे केली होती. दोन्ही बाजूने दिगग्ज उमेदवार दिल्याने निवडणुकीत चुरस होईल असे वाटत होते. मात्र भाजपने नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवत महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला. विशेष म्हणजे या निवडणुकीत महाविकासआघाडीच्या सरपंच व उपसरपंच यांना सुद्धा पराभवाला सामोरे जावे लागले.
या निवडणुकीत भाजपा पुरस्कृत गुरुनाथ पेडणेकर, दिनेश गावडे, लक्ष्मण कोठावळे, सुभाष बांदिवडेकर, आनंद राणे, हरी तारी, संजय सावंत, साबाजी परब, सखाराम बागवे, जयश्री गावडे, वैशाली कानसे आदी उमेदवार निवडून आलेत तर दीपक इन्सुलकर बिनविरोध निवडून आले.
सर्व विजयी उमेदवारांचे जिल्हा बँक संचालक महेश सारंग व भाजप मंडल अध्यक्ष महेश धुरी यांनी अभिनंदन केले.यावेळी माजी सभापती मानसी धुरी, पॅनलप्रमुख अशोक सावंत, गुरुनाथ पेडणेकर, डेंगवे उपसरपंच प्रविण देसाई, मधुकर देसाई, ग्रामपंचायत सदस्य स्वागत नाटेकर, नमिता नाईक, महेश धुरी, महेंद्र सावंत, महेंद्र पालव, सचिन दळवी, औदुंबर परब, महेश गावडे, विकास केरकर, उमेश पेडणेकर, आबा राणे,नितीन राऊळ, बाबू तावडे, अमेश कोठावळे, नंदू कोठावळे, नंदू नाईक, सत्यवान गावडे, अजय कोठावळे, प्रताप सावंत , राजाराम राणे,राजश्री शिंदे, जयराम पालव, प्रदीप सावंत, मयुर परब , संतोष मुळीक आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून संस्थेला सर्वोपतरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी गुरुनाथ पेडणेकर यांनी सर्व शेतकरी व ग्रामस्थांचे जाहीर आभार व्यक्त करत आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थकी लावू असे मत व्यक्त केले.