मालवण | सुयोग पंडित : राजापूर तालुका शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेडने कोकणातील मूळ भूमीपुत्रासांठी शेती,जमिन व एकंदर सांस्कृतिक रक्षणाचे आवाहन केले आहे.
राजापूर तालुका शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड तर्फे 16 आणि 17 एप्रिलला भव्य शेतकरी सभासद मेळावा व अपारंपारिक शेती मार्गदर्शन असे उपक्रम राबविण्यात येत असून त्याच पार्श्वभूमीवर सदर जागरुतीचे आवाहन केले गेले जात आहे.
कोकणातील लोकांनी मुंबईत येऊन प्रगती केली, सर्व उत्सव, क्रीडा,नाटक, सांस्कृतिक पंरपरा आजही मुंबईत टिकून ठेवली आहे पण या जागतिक स्पर्धा मध्ये ही पंरपरा आता लोप पावत आहे, गावाकडे पण आता भजन, भारुड, लोककला, नाटक ही सर्व कला कोकणातील जनतेने महाराष्ट्रला दिली, मुंबईत दिली पण पुढे अति शिक्षित युवकांनी ही पंरपरा सोडून फक्त पैसे कमवायचे ठरवून इकडे दुर्लक्ष केले आहे.
गावाकडे २५ वर्ष अगोदर गाव खेडी नटलेली होती. सर्व प्रकारचे धान्य, कडधान्य, भाजीपाला, फळें, फुले गावा गावात होती. कोकणात निसर्गाने सुंदर परीसर दिलेला आहे. लोक समाधानी, शुध्द जेवण व शुध्द हवा, सुंदर आरोग्य घेऊन जगत होती मात्र शिक्षण घेऊन जागतिक स्पर्धा मध्ये पैसे कमवायचेच आहेत हाच ध्यास घेऊन प्रत्येक ग्रामीण गावातील तरुण सर्व काही सोडून मुंबईत स्थलांतरित झाले व कोकणातील गाव वाड्या आता ओसाड होतआहेत . ज्यांची आता ४० ते ५० वर्ष झालेल्या वयाची माणसे आहेत ही माणसे गावाकडे जात येत असतात, गावाचा मंडळ चालवतात, गावाकडे घर सुधारणा करून गावाकडे विकास करीता धडपड करतात पण मागील १० वर्षात युवा पीढ़ी मात्र गावाकडे फक्त गणपती ,शिमगा व मे महिन्यात मौजमजा करण्यासाठी येतात या पलीकडे काही नवीन करण्याचा विचार करीत नाही. पावसाळ्यात तर येतच नाहीत. आई बाबांची शेती व गावचा विकास यावर काही संशोधन करण्यासाठी तयार नाहीत म्हणून गावाकडे प्रगती थांबली आहे. किमान पावसाळ्यात तरी लक्ष दिले पाहिजे.
५०किमी. ताशी चालणारी वाहने आता १२० किमी च्या गतीने धावत आहेत, रस्ते सिंमेट काॅन्क्रिटचे तयार होत आहेत. गावाकडे जाण्यासाठी विविध पर्याय आहेत आता २५ ते ४० वयोगटातील युवकांनी गावाकडे आधुनिक , सामुदायिक नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून गावाकडे हिरवे गार शेती करण्यासाठी प्रशिक्षण घेऊन प्रयोग केले पाहिजेत, शेती मध्ये गुंतवणूक केली तरच गावाकडे विकास होईल नाहीतर गावाकडे रस्ता पाहीजे, पाणी पाहिजे, समाज मंदिर पाहिजे, एसटी पाहिजे पण गावाकडे माणसे राहिली नाहीतर हा विकास काय कामाचा, अशा उदासीनता मुळे कोकण भकास होईल. म्हणून मित्रांनो गावाकडे चला महीन्यातून दोन दिवस जा, संशोधन करा, प्रकल्प तयार करा व गाव वाड्या विकसित करा. निसर्गाच्या सानिध्यात या, शुध्द हवा, ताजेतवाने होऊन ताजे अन्न खा, निरोगी रहा या करीता कोकणातील गावाकडे लक्ष दया. मुंबईत शहरात रहा, पण गावाकडे किमान लक्ष द्या, गाव तुमची जन्मभूमी आहे , तर मुंबई तुमची कर्मभूमी आहे हे लक्षात ठेऊन कोकणातील गावाकडे जाऊन विकास सुरू करुया अशी आवाहनात्मक हाक राजापूर तालुका शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड तर्फे कोकणवासियांना देण्यात आली आहे