23.7 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

ग्राहक पंचायत महाराष्ट्र, कणकवली तालुका शाखेची झाली स्थापना ; नामदेव जाधव अध्यक्ष तर श्रद्धा कदम उपाध्यक्ष.

- Advertisement -
- Advertisement -

कणकवली | प्रतिनिधी : भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते, ग्राहक पंचायतीचे संस्थापक व थोर स्वातंत्र्य सेनानी ग्राहकतीर्थ स्व. बिंदुमाधव जोशी स्थापित आणि शासनमान्य असलेल्या “ग्राहक पंचायत महाराष्ट्र” या संस्थेची कणकवली तालुका शाखा स्थापन करण्याबाबतची विशेष बैठक रविवारी कणकवली येथील महाराजा हॉल येथे संपन्न झाली. या बैठकीत तालुका कार्यकारिणीची घोषणा संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रा. एस. एन. पाटील यांनी जाहीर केली .


संपूर्ण अर्थव्यवस्थेचा कणा असलेला ग्राहक हा ख-या अर्थाने ‘राजा’ होण्यासाठी ग्राहकांचे संघटन महत्त्वाचे आहे.ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील पंचवीस जिल्ह्यांमध्ये ग्राहकांचे संघटन, ग्राहकांचे प्रबोधन व ग्राहकाला योग्य मार्गदर्शन करण्याचे कार्य करते .ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची जिल्हा शाखा कार्यरत असून वैभववाडी, देवगड, कुडाळ व सावंतवाडी येथे तालुका शाखा यापूर्वी कार्यरत आहेत. कणकवली येथे झालेल्या बैठकीत कणकवली शाखा कार्यकारणी जाहीर करण्यात आली .कणकवली तालुका अध्यक्ष पदी नामदेव विश्राम जाधव तर उपाध्यक्ष पदी श्रद्धा सूर्यकांत कदम यांची निवड करण्यात आली .

याशिवाय शितल मांजरेकर – संघटक.
डॉ. विठ्ठल गाड – सहसंघटक ,
महानंद चव्हाण – सचिव,
विनायक पाताडे – सहसचिव ,
सत्यविजय जाधव – कोषाध्यक्ष ,
विजय गांवकर प्रसिद्धी प्रमुख , तर
सल्लागार पदी अशोक करंबेळकर ,
मनोहर पालयेकर आणि रविंद्र मुसळे यांची निवड करण्यात आली .
ग्राहकाचे अज्ञान, संघटितपणाचा अभाव आणि ग्राहक संरक्षण कायद्याने प्राप्त झालेले हक्क,अधिकार आणि कर्तव्याकडे दुर्लक्ष यामुळे ग्राहकाची फसवणूक, अडवणूक होत आहे.
ग्राहक राजा जागृत करण्याच्या उद्देशाने कणकवली तालुका शाखा स्थापन करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष प्रा.श्री.एस.एन.पाटील यांनी यावेळी सांगितले . या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष श्री.एकनाथ गावडे, संघटक श्री.सीताराम उर्फ दादा कुडतरकर व सचिव श्री.संदेश तुळसणकर , राजेंद्र पेडणेकर , संजय मालंडकर , भाई चव्हाण , रवींद्र कडुलकर , सुभाष राणे , निलेश राणे , योगेश चव्हाण आदी उपस्थित होते .

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कणकवली | प्रतिनिधी : भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते, ग्राहक पंचायतीचे संस्थापक व थोर स्वातंत्र्य सेनानी ग्राहकतीर्थ स्व. बिंदुमाधव जोशी स्थापित आणि शासनमान्य असलेल्या "ग्राहक पंचायत महाराष्ट्र" या संस्थेची कणकवली तालुका शाखा स्थापन करण्याबाबतची विशेष बैठक रविवारी कणकवली येथील महाराजा हॉल येथे संपन्न झाली. या बैठकीत तालुका कार्यकारिणीची घोषणा संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रा. एस. एन. पाटील यांनी जाहीर केली .


संपूर्ण अर्थव्यवस्थेचा कणा असलेला ग्राहक हा ख-या अर्थाने 'राजा' होण्यासाठी ग्राहकांचे संघटन महत्त्वाचे आहे.ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील पंचवीस जिल्ह्यांमध्ये ग्राहकांचे संघटन, ग्राहकांचे प्रबोधन व ग्राहकाला योग्य मार्गदर्शन करण्याचे कार्य करते .ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची जिल्हा शाखा कार्यरत असून वैभववाडी, देवगड, कुडाळ व सावंतवाडी येथे तालुका शाखा यापूर्वी कार्यरत आहेत. कणकवली येथे झालेल्या बैठकीत कणकवली शाखा कार्यकारणी जाहीर करण्यात आली .कणकवली तालुका अध्यक्ष पदी नामदेव विश्राम जाधव तर उपाध्यक्ष पदी श्रद्धा सूर्यकांत कदम यांची निवड करण्यात आली .

याशिवाय शितल मांजरेकर - संघटक.
डॉ. विठ्ठल गाड - सहसंघटक ,
महानंद चव्हाण - सचिव,
विनायक पाताडे - सहसचिव ,
सत्यविजय जाधव - कोषाध्यक्ष ,
विजय गांवकर प्रसिद्धी प्रमुख , तर
सल्लागार पदी अशोक करंबेळकर ,
मनोहर पालयेकर आणि रविंद्र मुसळे यांची निवड करण्यात आली .
ग्राहकाचे अज्ञान, संघटितपणाचा अभाव आणि ग्राहक संरक्षण कायद्याने प्राप्त झालेले हक्क,अधिकार आणि कर्तव्याकडे दुर्लक्ष यामुळे ग्राहकाची फसवणूक, अडवणूक होत आहे.
ग्राहक राजा जागृत करण्याच्या उद्देशाने कणकवली तालुका शाखा स्थापन करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष प्रा.श्री.एस.एन.पाटील यांनी यावेळी सांगितले . या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष श्री.एकनाथ गावडे, संघटक श्री.सीताराम उर्फ दादा कुडतरकर व सचिव श्री.संदेश तुळसणकर , राजेंद्र पेडणेकर , संजय मालंडकर , भाई चव्हाण , रवींद्र कडुलकर , सुभाष राणे , निलेश राणे , योगेश चव्हाण आदी उपस्थित होते .

error: Content is protected !!