आचरा | प्रतिनिधी : आचरा वरचीवाडी येथे आज सकाळी साडेसातच्या सुमारास विद्युत समस्या दुरुस्तीसाठी गेलेले कंत्राटी विद्युत कर्मचारी आनंद कृष्णा मिराशी यांना जोरदार विजेचा धक्का लागल्याने ते फेकले जाऊन गंभीर जखमी झाले.यात त्यांना विद्युत धक्क्याने गंभीर दुखापत झाली आहे.
याबाबत तातडीने हालचाल करत येथील ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र प्रकृती गंभीर असल्याने आनंदला अधिक उपचारासाठी कणकवली येथे दाखल करण्यात आले आहे. आचरा वरचीवाडी येथे जनित्रात उद्भवलेल्या विद्युत समस्या दुरुस्त करण्यासाठी विद्युत जनित्रा जवळ काम करत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू होऊन आनंद मिराशी यांना जोरदार धक्का लागून ते फेकले जाऊन गंभीर जखमी झाले. आनंद मिराशी यांना धक्का लागल्याचे समजताच अभय भोसले, जिल्हा परिषद सदस्य जेराँन फर्नांडिस, गुरुप्रसाद कांबळी, विद्युत मंडळाचे अधिकारी यांनी धावाधाव करत त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र प्रक्रूती गंभीर असल्याने त्यांना कणकवली येथील खाजगी रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
नेहमी सहकार्याची भावना घेऊन लोकांच्या विद्यूत समस्या दूर करण्यासाठी धावणाऱ्या आनंदच्या या दुर्दैवी अपघातामुळे हळहळ व्यक्त केली जात होती. या अपघातामुळे आचरा भागातील विद्युत पुरवठा दुपार पर्यंत खंडित झाला होता.