24.8 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

आचरा येथे रामनवमी निमित्त जिल्हास्तरीय शुटींग बॉल स्पर्धा…!

- Advertisement -
- Advertisement -

श्री अभय भोसले मित्रमंडळाचे आयोजन…. !

चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा येथे रामनवमी उत्सवा निमित्त ‘श्री अभय भोसले मित्रमंडळ आचरा’ यांच्यावतीने बुधवार दिनांक १३ एप्रिल २०२२ रोजी आचरा रामेश्वर मंदिर नजिकच्या मैदानावर दिवस- रात्र जिल्हास्तरीय शुटींग बॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेतील प्रथम क्रमांक पारितोषिक ७००० व चषक, द्वितीय क्रमांक ५००० चषक, तृतीय क्रमांक-२०००, चतुर्थ क्रमांक – २००० सहभागी सर्व संघाना रोख रुपये १००० मानधन म्हणुन दिले जातील याची नोंद संघानी घ्यायची आहे.
स्पर्धा रामनवमी निमित्त असल्याने ठीक ०६ वाजता सुरू होईल असे सर्व संघांना सूचीत करण्यात आले असून रात्री जेवणाची व्यवस्था मंडळातर्फे करण्यात आलेली आहे.

आपल्या संघाची नाव नोंदणी श्री सदा पुजारे (मोबाईल नंबर- ९५४५०५५२४६ ) किंवा श्री सुरेंद्र(अण्णा)सकपाळ मोबाईल (नंबर- ९४२३३०१५८४ फोन नंबर- ०२३६५-२४६०९९) या नंबरवर १३ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत करायची आहेत.

संघ कमी आल्यास साखळी पद्धतीने सामने चालु केले जातील सामने चालु झाल्यानंतर प्रवेश दिला जाणार नाही तरी जास्तीत जास्त संघानी सहभाग घेऊन सहकार्य करावे असे आवाहन सदर मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

श्री अभय भोसले मित्रमंडळाचे आयोजन.... !

चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा येथे रामनवमी उत्सवा निमित्त 'श्री अभय भोसले मित्रमंडळ आचरा' यांच्यावतीने बुधवार दिनांक १३ एप्रिल २०२२ रोजी आचरा रामेश्वर मंदिर नजिकच्या मैदानावर दिवस- रात्र जिल्हास्तरीय शुटींग बॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेतील प्रथम क्रमांक पारितोषिक ७००० व चषक, द्वितीय क्रमांक ५००० चषक, तृतीय क्रमांक-२०००, चतुर्थ क्रमांक - २००० सहभागी सर्व संघाना रोख रुपये १००० मानधन म्हणुन दिले जातील याची नोंद संघानी घ्यायची आहे.
स्पर्धा रामनवमी निमित्त असल्याने ठीक ०६ वाजता सुरू होईल असे सर्व संघांना सूचीत करण्यात आले असून रात्री जेवणाची व्यवस्था मंडळातर्फे करण्यात आलेली आहे.

आपल्या संघाची नाव नोंदणी श्री सदा पुजारे (मोबाईल नंबर- ९५४५०५५२४६ ) किंवा श्री सुरेंद्र(अण्णा)सकपाळ मोबाईल (नंबर- ९४२३३०१५८४ फोन नंबर- ०२३६५-२४६०९९) या नंबरवर १३ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत करायची आहेत.

संघ कमी आल्यास साखळी पद्धतीने सामने चालु केले जातील सामने चालु झाल्यानंतर प्रवेश दिला जाणार नाही तरी जास्तीत जास्त संघानी सहभाग घेऊन सहकार्य करावे असे आवाहन सदर मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!