27.5 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

अनुसूचित जाती उपाय योजना अंतर्गत न. पं. ला 1 कोटी 42 लाखांचा निधी मंजूर : सुजित जाधव.

- Advertisement -
- Advertisement -

सत्ताधारी नगरसेवकांनी फुकटचे श्रेय न घेण्याचा सुजीत जाधवांचा सल्ला..!

खासदार विनायक राऊत साहेब यांच्या पाठपुरव्यामुळे निधी मिळाल्याचा सुजीत जाधवांचा दावा...!

कणकवली | प्रतिनिधी : जिल्हा वार्षिक योजना अनुसूचित जाती उपायोजना याअंतर्गत कणकवली नगरपंचायतिच्या विकास कामांसाठी मागील दहा वर्षे रखडलेली कामे विरोधी गटनेते सुशांत नाईक , कन्हैया पारकर यांनी खासदार विनायक राऊत साहेब यांच्या जवळ पुढील कामे मंजुरी साठी पाठपुरावा केला, खासदार विनायक राऊत साहेब यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या कडे सदर कामे मंजूर करून घेतली. 1 कोटी 42 लाख 28 हजारच्या दलीतवस्ती (अनुसूचित जाती उपयोजना) विकास कामांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. गेल्या 10 वर्षात ही कामे रखडली असताना आम्ही मुख्याधिकारी आणि खासदार विनायक राऊत साहेब यांच्या कडे पाठपुरावा केला त्याला सकारात्मक सहकार्य करत पालकमंत्री उदय सामंत यांनी भरघोस निधी प्राप्त करून दिला, , या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याने लवकरच ही कामे सुरू करण्यात येणार आहेत. या मंजूर कामांमध्ये नवबौद्ध स्मशानभूमी नूतनीकरण करणे 51 लाख 55 हजार, सिद्धार्थ नगर येथील अंगणवाडी बांधकाम करणे 13 लाख 86 हजार, सिद्धार्थनगर आंबेडकर भवन जवळ सभामंडप व व्यासपीठ बांधणे 42 लाख 37 हजार, पराष्ट्येकर घराशेजारील गटारावर स्लॅब टाकणे 5 लाख 65 हजार, बौद्ध मंदिर फूटपाथ नूतनीकरण करणे 6 लाख 82 हजार, मनोज कांबळे घराशेजारी सार्वजनिक विहिर बांधकाम करणे 11 लाख 66 हजार, बौद्धवाडी भाई जाधव घराशेजारील कॉंक्रीट गटारावर स्लॅब टाकणे 5 लाख 19 हजार, मनोज कांबळे ते अरुण जाधव घर काँक्रीट गटार बांधणे 5 लाख 18 हजार अशी एकूण 1 कोटी 42 लाख 28 हजार यांच्या कामांना प्रशासकीय कामा करिता शिवसेना नेते संदेश पारकर,विरोधी गटनेता नगरसेवक सुशांत नाईक , सर्व नगरसेवक आणि कणकवली शिवसेना कार्यकर्ते यांनी विशेष पाठपुरावा केला . त्यामुळे सत्ताधारी नगरसेवकांनी फुकटचे श्रेय न घेता कणकवलीच्या विकासासाठी भरघोस निधी दिल्या बद्दल खासदार विनायक राऊत साहेब आणि पालकमंत्री उदय सामंत साहेबांचे आभार मानून मनाचा मोठे पण दाखवावा .

सोनगेवाडी मधील स्थानिक रहिवाशी आणि माझी सही असलेल्या अर्ज मुख्याधिकारी यांच्या जवळ आहे तो वाचून आपल्या नगरसेवकांना श्रेय द्यावे, लोकांनी निवडून दिलेल्या सोनगेवाडी मधील नगरसेवकांना कधीतरी वार्ड मध्ये फिरत जाण्याचा सल्ला द्यावा. कारण ये पब्लिक है सब जानती है असेही श्री.सुजीत जाधव यांनी सांगितले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!