कणकवली | प्रतिनिधी (विशेष वृत्त) : वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम करण्यापेक्षा दिवीजा वृद्धाश्रमात जाऊन आजी-आजोबांसोबत वाढदिवस साजरा करण्याचे ठरवून वृद्धाश्रमाला जीवनावश्यक वस्तू व आर्थिक स्वरूपात मदत देऊन एक सामाजिक बांधिलकीचा वसा जोपासण्याचे काम महत्वाचे आहे.या वृद्धाश्रमाला खारीचा वाटा म्हणून मदत आम्ही केली आहे.माझ्या पुढील जीवनात दिविजा वृद्धाश्रमातील आजी- आजोबांचे आशीर्वाद हीच प्रेरणा ठरेल असा विश्वास माजी उपसभापती महेश गुरव यांनी व्यक्त केला.
असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमाला जीवनावश्यक वस्तू वा आर्थिक मदत कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी माजी सभापती मनोज रावराणे, माजी उपसभापती संतोष कानडे, भाजपा उपाध्यक्ष सोनू सावंत, असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, सोसायटी चेअरमन भगवान लोके,तंटामुक्त समिती अध्यक्ष बाबाजी शिंदे,उपसरपंच संदीप जाधव,माजी सरपंच शंकर गुरव,बाळा बाणे,पांडुरंग बाणे, वृद्धाश्रम अध्यक्ष दीपिका रांबाडे,सचिव संदेश शेट्ये आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी आजी आजोबांसोबत केक कापून महेश गुरव यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.असलदे गावाच्या वतीने माजी उपसभापती महेश गुरव यांचा शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सरपंच श्री.वायगणकर यांनी सत्कार केला.यावेळी मान्यवरांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
तसेच पूर्ण प्राथमिक शाळा आशिये येथे माजी उपसभापती महेश गुरव यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांना खाऊ वाटप करत केक कापण्यात आला. यावेळी आशिये गावाच्या वतीने माजी सरपंच शंकर गुरव यांच्या हस्ते महेश गुरव यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच शारदा गुरव,उपसरपंच संदीप जाधव,माजी सरपंच शंकर गुरव,बाळा बाणे,पांडुरंग बाणे,संजय बाणे,संतोष जाधव,प्रवीण ठाकूर,प्रवीण पावसकर,किशोर बाणे,ग्रामसेवक राकेश गोवळकर,शिवा गुरव, अनिल जाधव,सचिन गुरव,संदेश गुरव,समीर ठाकूर,समीरा ठाकूर,शिक्षक,ग्राम पंचायत कर्मचारी आदींसह आशिये गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.