सोनू सावंत यांच्या इशाऱ्यानंतर झाले काम
कणकवली | उमेश परब : वरवडे गावामधील वीजपुरवठा सातत्याने खंडित होण्याबाबत भाजपा तालुका उपाध्यक्ष सोनू सावंत यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी कार्यकारी अभियंत्यांची भेट घेतली होती. यावेळी फणसवाडीतील ट्रान्सफॉर्मरचा विषय तातडीने मार्गी न लागल्यास गप्प बसणार नाही, असा इशारा दिला होता. त्यानुसार चार दिवसात हा प्रश्न मार्गी लागला आहे. रविवारी या ट्रान्सफॉर्मरचा शुभारंभ पंचायत समिती सदस्या राधिका सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी भाजपा तालुका उपाध्यक्ष सोनू सावंत, हनुमंत बोन्द्रे,अमोल बोन्द्रे, प्रदीप घाडीगांवकर, सिरील फर्नाडिस, प्रमोद गावडे, पोलीस पाटील , अभि पडते ,दिलीप चव्हाण, रुजया बारीस, वालावलकर मॅडम, कुंभार,लवेश पवार,राजम , कारंडे , मदन मेस्त्री,विजय कदम, मधुकर परब,संदिप मेस्त्री, सादिक कुडाळकर, सचिन घाडीगांवकर, विवेक राणे, आदी उपस्थित होते.
ट्रान्सफॉर्मर साठी गेली दोन वर्षे प्रयत्न केल्यानंतर काम करण्यात आले. मात्र किरकोळ कामासाठी वर्षभर हा विषय प्रलंबित होता. यामुळे या भागात कमी दाबाने वीजपुरवठा होत अनेक उपकरणे निकामी झाली होती. त्यामुळे सोनू सावंत यांच्या इशाऱ्यानंतर हा प्रश्न मार्गी लागला आहे. याबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.