वैभववाडी |नवलराज काळे : कोल्हापूरहून कणकवलीच्या दिशेने रिकामा ट्रक (एमएच 07 एजे 1836) जात होता. करूळ चेक नाका नजीकच्या धोकादायक वळणावर चालकाचा ट्रक वरील ताबा सुटला. व ट्रक साईड पट्टी बाहेर असलेल्या दगडावर जोरदार आदळला आणि पलटी झाला.
या अपघातात चालक सुनील सुरेश पवार वय 22 रा. तरळे याच्या डोक्याला व कानाला मार लागला आहे. तसेच मयूर सुरेंद्र दुधवडकर वय 18 रा. तरळे हा देखील जखमी झाला आहे. स्थानिकांनी या दोघांनाही उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. त्यांच्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. अपघाताची नोंद वैभववाडी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.