बांदा | राकेश परब : सध्याच्या काळात जीवनावश्यक ठरलेली वीज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दऱ्या, डोंगरातून वीज ग्राहकांना पोचवणाऱ्या वीज कामगारांचा सन्मान १५ स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून करण्यात आला. यावेळी श्रीराम सडवेलकर, सूर्यकांत कांबळे, पद्माकर सातार्डेकर, शशिकांत कुंभार , गौरेश कर्पे, दयानंद कदम, सत्यवान मुळीक, मिलिंद कदम, संजय मोरे, जयवंत घाडी या उपविभागीय कार्यालयात तांत्रिक कामगारांना, तर मळेवाड येथील इनायातुल्ला राजगुरू आणि कुंभार माठ येथील सतीश नाईक या प्रधान यांत्राचालकाना सन्मान करण्यात आला.
काल स्वातंत्र्यदिनी अधिक्षक अभियंता श्री विनोद पाटील यांनी या गुणवान वीज कामगारांचा सन्मान चिन्ह आणि विशेष गुणगौरव पत्र देऊन गौरव केला.यावेळी श्री लोकरे, कार्यकारी अभियंता, सौ. कांबळे, व्यवस्थापक (मास) तसेच महावितरण कंपनी चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.गावोगावी, जंगल, दऱ्या डोंगरातून वीज वाहिनीवर काम करणारे वीज कामगार हाच व्यवस्थेचा कणा आहे आणि त्यांचे परिश्रम नेहमीच दखल घेण्यासारखे आहेत असे प्रतिपादन अधीक्षक अभियंता श्री विनोद पाटील यांनी केले आहे. सन्मान प्राप्त वीज कामगारांवर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.