24.6 C
Mālvan
Sunday, December 29, 2024
IMG-20240531-WA0007
ADVT Natal Jeron F

नगरपंचायत मधील सत्ताधाऱ्यांच्या वरदहस्तखालील काही घरतोडी बिल्डर लॉबीची कणकवलीत दांडगाई.

- Advertisement -
- Advertisement -

कणकवली | प्रतिनिधी: कणकवली शहरातल्या काही मोक्‍याच्या ठिकानावर जागा जमीन मिळकती आणि बिल्डिंग शोधण्याचे काही नगरसेवक सत्ताधाऱ्यांचे भाऊबंद यांना हे काम सोपविण्यात आलेले आहे. लोकांच्या जमिनी बळकावणे, जमीन मालकांची अडवणूक करणे, काही ठराविक बिल्डर लॉबीशी संगनमत करून कणकवली शहरातील मोक्याच्या जागा गिळंकृत करणे, हडप करणे, जमीन मालक रहिवाशी भाडेकरू यांना धाक धाप्तशही करून, वेगवेगळी आमिषे दाखवून लोकांच्या जमिनी लाटण्यासाठी कणकवलीत सत्तेचा दुरुपयोग सुरू आहे.कणकवलीत पटवर्धन चौकातील नगर भूमापन क्रमांक 1334 ते 1341 मधील एक 3 मजली इमारत जमीनदोस्त करण्यात आली. कणकवली शहरातला हा चौथा प्रकार आहे अशाच प्रकारे कणकवली बाजारपेठेतील टोनेमारे बिल्डिंगला रातोरात आग लावून बेचिराख केली गेली. येथील सर्व भाडोत्री लोकांना उध्वस्त केले गेले. या सर्व प्रकारातील ज्या बिल्डरांनी या जागांवर बिल्डींग उभारल्या आहेत. त्या सर्वांचे आर्थिक व्यवहार, जमीन व्यवहार आणि बांधकाम व्यवहार आणि परवानगी बाबत चौकशीची मागणी करणार आहे.कणकवलीत आजवर एसटी बस स्टँड समोरील आरोलकर बिल्डिंग जेसिबी मशीन्स लावून रातोरात पाडली गेली. येथील अनेक भाडोत्री उद्धवस्त झाले.जळके वाडीतील श्रीमती कडुलकर यांचीही बिल्डींग अशीच पाडण्यात आली, ती भगिनी आजही रडते आहे.आणि आताच चौथा हा मोर्ये बिल्डींग चा प्रकार तसाच करण्यात आला ही बिल्डींग रातोरात पाडण्यात आली. या बिल्डींग बाबतबपोलिसांना विजयालक्ष्मी धुमाळे यांच्या तक्रारीतून या ठिकाणी बिल्डिंग तोडण्यासाठी असलेले 3 जेसिबी एक MH-07 t 20, दोन MH-07 A9780 , व MH-07 9855 आणि 2 डंपर यापैकी एक MH – 07 C 5521 , दोन MH -07 AJ 6354 आणि टेम्पो क्रमांक MH04 CG 4850 हे नंबर दिलेले आहेत. मात्र अद्यापही पोलिसांनी त्यांचे जबाब घेतलेले नाहीत असा आरोप करण्यात येत आहे.

फिर्यादीना तुम्ही त्या ठिकाणी भाडेकरू होता का याचे पुरावे सादर करा अशी नोटीस पाठवतात. हे सगळं संशयास्पद आहे. याबरोबरच पोलीस शहरातील 3 मजली इमारत रातोरात गायब होते. त्यातील सामान चोरून नेले जाते. इमारतीचा मलबा गायब केला जातो याचा शोध मात्र पोलीस अद्याप घेत नाहीत. हे सार गौडबंगाल आहे. या सर्व गैर कारभाराकडे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेही लक्ष वेधणार आहे.दरम्यान मोर्ये बिल्डींग बाबत पोलिसांनी योग्य भूमिका बजावावी आणि आरोपींना त्वरित अटक करावी अशी आमची मागणी आहे. या प्रकरणात पोलीसांची भूमिका संशयास्पद आहे.या प्रकरणात तक्रारदाराच्या जीविताला धोका असून त्यामुळे त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी आमची मागणी आहे. कणकवली पोलिसांच्या विश्वासार्हतेबाबत शंखा यामुळेच निर्माण झाली आहे. सर्वसाधारण नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण यामुळे निर्माण झाले आहे.हा प्रकार पहाटे, दिवसाढवळ्या आणि रात्री असा सतत तीन दिवस घडत असताना पोलीस बघ्याची भूमिका घेतात ही लाजिरवाणी बाब आहे. माझ्या माहिती प्रमाणे मेहरबान न्यायालयाने आरोपी येथील वावरला स्थगिती असतानाही आरोपी मिळकतीत अजूनही वावरत आहेत आणि न्यायालयाचा वारंवार अपमान करत आहेत.आरोपींवर पोलिसांची कारवाई न होण्यामागे झारीतले शुक्राचार्य कोण यांची नावे योग्य वेळी मी जाहीर करणार आहे.तक्रारदारांनी गुन्हा क्रमांक 56/2022 शनिवार दिनांक 26 मार्च 2022 तक्रार दिलेली आहे. मात्र पोलीस कारवाई करत नसल्याने आरोपी उघडपणे फिरताहेत. तक्रारदारांना धमकावत आहेत. कणकवली पोलीस म्हणजे कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार आहे असे आमचे मत आहे.कणकवली शहरातील अनेक बिल्डींग या घरतोडी गॅंग आणि जमीन माफियां असलेल्या या टोळक्याच्या निशाण्यावर आहेत. त्यामुळे कणकवलीतील नागरिकांनी सजग आणि सावध रहकावे. कधीही अचानक रात्रीच्या वेळी कोणतेही घर कोसळण्याची, पेटण्याची, जमीनदोस्त होण्याची भीती आहे. जेसीबी घेऊन ठराविक चिमट्या भाई तयारच आहेत. कणकवली शहराची आध्यत्मिक संत म्हणून परमपूज्य भालचंद्र महाराजांची पुण्य भूमी आणि कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांनी कर्मभूमी म्हणून ही खरी कणकवली ची ओळख आहे. ही ओळख पुसून टाकण्याचा या नगरपंचायत सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे या अपप्रवृत्ती चा आम्ही बिमोड करणार आहोतच, शिवाय या प्रवृत्ती ला नियती कधीच माफ करणार नाही कारण अनेकांचे संसार यांनी उद्धवस्त केलेले आहेत.अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे हा माझा स्थायीभाव आहे. त्यात कधीच बदल करणार नाही. अन्याय अत्याचार विरुद्ध अखेरपर्यंत लढणार आहे. जनतेला न्याय आणि त्यांचा हक्क हा मिळवून देणार आहे.या बिल्डींग मधील डॉ अनंत रेवडेकर हे सुसंस्कृत, सेवाभावी डॉक्टर म्हणून अनेक पिढ्याना माहीत आहेत. त्यांनी कणकवली वाशी यांनाच नव्हे तर जिल्हावासीयांना अत्यंत चांगली सेवा दिली होती. खरतर आशा व्यक्तींच्या स्मृती जपण्याच्या सोडून त्यांची 60 वर्षाहून अधिक वर्षाची सेवा आणि त्याच्या आठवणी उद्धवस्त करण्याचा प्रयत्न झाला आहे.त्याचबरोबर दलित चळवळीतील नेते एन एस कंदळगावकर यांचे कार्यालय देखील याच इमारतीत होते. असंख्य दलित बांधवांना न्याय मिळवून देण्याचे काम आणि त्यांची सरकारदप्तरी असलेली कामे करून देण्याचे कार्य याच इमारतीतून त्यांनी केले त्यांचा लढा आज उध्वस्त केला गेला आहे.

कणकवलीच्या सत्ताधाऱ्यांचा हा सत्तेचा उन्माद आणि त्यातून नगरपंचायत इमारतीचा या गुंडांच्या कळपाने जो अड्डा बनवला आहे तो आपण उद्धवस्त करणार आहे.या सर्व प्रकरणात उद्धवस्त झालेल्या नागरिकांना सोबत घेऊन न्याय देण्यासाठी आपण लढा उभारणार आहोत, वेळ पडल्यास कुणाच्याही विरोधात जाण्याची वेळ आली तरीदेखील आपण गप्प बसणार नाही असे तक्रारदारांचे म्हणणे आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कणकवली | प्रतिनिधी: कणकवली शहरातल्या काही मोक्‍याच्या ठिकानावर जागा जमीन मिळकती आणि बिल्डिंग शोधण्याचे काही नगरसेवक सत्ताधाऱ्यांचे भाऊबंद यांना हे काम सोपविण्यात आलेले आहे. लोकांच्या जमिनी बळकावणे, जमीन मालकांची अडवणूक करणे, काही ठराविक बिल्डर लॉबीशी संगनमत करून कणकवली शहरातील मोक्याच्या जागा गिळंकृत करणे, हडप करणे, जमीन मालक रहिवाशी भाडेकरू यांना धाक धाप्तशही करून, वेगवेगळी आमिषे दाखवून लोकांच्या जमिनी लाटण्यासाठी कणकवलीत सत्तेचा दुरुपयोग सुरू आहे.कणकवलीत पटवर्धन चौकातील नगर भूमापन क्रमांक 1334 ते 1341 मधील एक 3 मजली इमारत जमीनदोस्त करण्यात आली. कणकवली शहरातला हा चौथा प्रकार आहे अशाच प्रकारे कणकवली बाजारपेठेतील टोनेमारे बिल्डिंगला रातोरात आग लावून बेचिराख केली गेली. येथील सर्व भाडोत्री लोकांना उध्वस्त केले गेले. या सर्व प्रकारातील ज्या बिल्डरांनी या जागांवर बिल्डींग उभारल्या आहेत. त्या सर्वांचे आर्थिक व्यवहार, जमीन व्यवहार आणि बांधकाम व्यवहार आणि परवानगी बाबत चौकशीची मागणी करणार आहे.कणकवलीत आजवर एसटी बस स्टँड समोरील आरोलकर बिल्डिंग जेसिबी मशीन्स लावून रातोरात पाडली गेली. येथील अनेक भाडोत्री उद्धवस्त झाले.जळके वाडीतील श्रीमती कडुलकर यांचीही बिल्डींग अशीच पाडण्यात आली, ती भगिनी आजही रडते आहे.आणि आताच चौथा हा मोर्ये बिल्डींग चा प्रकार तसाच करण्यात आला ही बिल्डींग रातोरात पाडण्यात आली. या बिल्डींग बाबतबपोलिसांना विजयालक्ष्मी धुमाळे यांच्या तक्रारीतून या ठिकाणी बिल्डिंग तोडण्यासाठी असलेले 3 जेसिबी एक MH-07 t 20, दोन MH-07 A9780 , व MH-07 9855 आणि 2 डंपर यापैकी एक MH - 07 C 5521 , दोन MH -07 AJ 6354 आणि टेम्पो क्रमांक MH04 CG 4850 हे नंबर दिलेले आहेत. मात्र अद्यापही पोलिसांनी त्यांचे जबाब घेतलेले नाहीत असा आरोप करण्यात येत आहे.

फिर्यादीना तुम्ही त्या ठिकाणी भाडेकरू होता का याचे पुरावे सादर करा अशी नोटीस पाठवतात. हे सगळं संशयास्पद आहे. याबरोबरच पोलीस शहरातील 3 मजली इमारत रातोरात गायब होते. त्यातील सामान चोरून नेले जाते. इमारतीचा मलबा गायब केला जातो याचा शोध मात्र पोलीस अद्याप घेत नाहीत. हे सार गौडबंगाल आहे. या सर्व गैर कारभाराकडे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेही लक्ष वेधणार आहे.दरम्यान मोर्ये बिल्डींग बाबत पोलिसांनी योग्य भूमिका बजावावी आणि आरोपींना त्वरित अटक करावी अशी आमची मागणी आहे. या प्रकरणात पोलीसांची भूमिका संशयास्पद आहे.या प्रकरणात तक्रारदाराच्या जीविताला धोका असून त्यामुळे त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी आमची मागणी आहे. कणकवली पोलिसांच्या विश्वासार्हतेबाबत शंखा यामुळेच निर्माण झाली आहे. सर्वसाधारण नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण यामुळे निर्माण झाले आहे.हा प्रकार पहाटे, दिवसाढवळ्या आणि रात्री असा सतत तीन दिवस घडत असताना पोलीस बघ्याची भूमिका घेतात ही लाजिरवाणी बाब आहे. माझ्या माहिती प्रमाणे मेहरबान न्यायालयाने आरोपी येथील वावरला स्थगिती असतानाही आरोपी मिळकतीत अजूनही वावरत आहेत आणि न्यायालयाचा वारंवार अपमान करत आहेत.आरोपींवर पोलिसांची कारवाई न होण्यामागे झारीतले शुक्राचार्य कोण यांची नावे योग्य वेळी मी जाहीर करणार आहे.तक्रारदारांनी गुन्हा क्रमांक 56/2022 शनिवार दिनांक 26 मार्च 2022 तक्रार दिलेली आहे. मात्र पोलीस कारवाई करत नसल्याने आरोपी उघडपणे फिरताहेत. तक्रारदारांना धमकावत आहेत. कणकवली पोलीस म्हणजे कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार आहे असे आमचे मत आहे.कणकवली शहरातील अनेक बिल्डींग या घरतोडी गॅंग आणि जमीन माफियां असलेल्या या टोळक्याच्या निशाण्यावर आहेत. त्यामुळे कणकवलीतील नागरिकांनी सजग आणि सावध रहकावे. कधीही अचानक रात्रीच्या वेळी कोणतेही घर कोसळण्याची, पेटण्याची, जमीनदोस्त होण्याची भीती आहे. जेसीबी घेऊन ठराविक चिमट्या भाई तयारच आहेत. कणकवली शहराची आध्यत्मिक संत म्हणून परमपूज्य भालचंद्र महाराजांची पुण्य भूमी आणि कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांनी कर्मभूमी म्हणून ही खरी कणकवली ची ओळख आहे. ही ओळख पुसून टाकण्याचा या नगरपंचायत सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे या अपप्रवृत्ती चा आम्ही बिमोड करणार आहोतच, शिवाय या प्रवृत्ती ला नियती कधीच माफ करणार नाही कारण अनेकांचे संसार यांनी उद्धवस्त केलेले आहेत.अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे हा माझा स्थायीभाव आहे. त्यात कधीच बदल करणार नाही. अन्याय अत्याचार विरुद्ध अखेरपर्यंत लढणार आहे. जनतेला न्याय आणि त्यांचा हक्क हा मिळवून देणार आहे.या बिल्डींग मधील डॉ अनंत रेवडेकर हे सुसंस्कृत, सेवाभावी डॉक्टर म्हणून अनेक पिढ्याना माहीत आहेत. त्यांनी कणकवली वाशी यांनाच नव्हे तर जिल्हावासीयांना अत्यंत चांगली सेवा दिली होती. खरतर आशा व्यक्तींच्या स्मृती जपण्याच्या सोडून त्यांची 60 वर्षाहून अधिक वर्षाची सेवा आणि त्याच्या आठवणी उद्धवस्त करण्याचा प्रयत्न झाला आहे.त्याचबरोबर दलित चळवळीतील नेते एन एस कंदळगावकर यांचे कार्यालय देखील याच इमारतीत होते. असंख्य दलित बांधवांना न्याय मिळवून देण्याचे काम आणि त्यांची सरकारदप्तरी असलेली कामे करून देण्याचे कार्य याच इमारतीतून त्यांनी केले त्यांचा लढा आज उध्वस्त केला गेला आहे.

कणकवलीच्या सत्ताधाऱ्यांचा हा सत्तेचा उन्माद आणि त्यातून नगरपंचायत इमारतीचा या गुंडांच्या कळपाने जो अड्डा बनवला आहे तो आपण उद्धवस्त करणार आहे.या सर्व प्रकरणात उद्धवस्त झालेल्या नागरिकांना सोबत घेऊन न्याय देण्यासाठी आपण लढा उभारणार आहोत, वेळ पडल्यास कुणाच्याही विरोधात जाण्याची वेळ आली तरीदेखील आपण गप्प बसणार नाही असे तक्रारदारांचे म्हणणे आहे.

error: Content is protected !!