मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :मालवण तालुक्यातील खोटले येथील श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान येथे ३ एप्रिल रोजी स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी ५.३० ते ९ पर्यंत काकड आरती, नित्योपासना, श्रींचा अभिषेक आणि पूजा. १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२.१५ वाजता कुंकुमार्जन, १२.३० महाआरती व तीर्थप्रसाद, महाभोग. रात्री ७ ते १० पर्यंत सुस्वर भजने व महाप्रसाद आणि रात्री १० वाजता जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ निर्मित ‘ विघ्न निवारी गजमुख तारी’ हे पौराणिक नाटक होणार आहे. सदर कार्यक्रमांना उपस्थिती दर्शविण्याचे आवाहन मठाधिपती गणेश घाडीगावकर यांनी केले आहे. येथीलपालखी सोहळा फार महत्वपूर्ण असतो.स्वामी समर्थांनी स्वामी सुत महाराज यांना दिलेल्या आत्मलिंग प्रति आत्मलिंग पादुका या ठिकाणी विराजमान असल्यामुळे येथील स्थानाला फार महत्व आहे. इथे नवस बोलले जात नाहीत, आणि फेडलेही जात नाहीत.या स्थळा मध्ये स्वामी महाराज यांचेकडे फक्त श्रद्धापूर्वक आपली समस्या प्रार्थनेच्या रुपात मांडली की स्वामी महाराज संकटमुक्त करतात व आपल्या सुप्त इच्छा पूर्ण करतात असा भाविकांचा ठाम विश्वास आहे. म्हणूनच या स्थानाला स्वामी मठ न म्हणता स्वामी समर्थ श्रद्धास्थान अशी ओळख आहे अशी माहिती मठाधिपती गणेश घाडीगांवकर यांनी दिली आहे.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -