आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली शहर युवासेनेच्यावतीने चौंडेश्वरी मंदिर समोरील फौजदारवाडी येथील मैदानावर आयपीएलच्या धर्तीवर आयोजीत क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन..
कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : कणकवली युवा सेनेतर्फे आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेचा उपक्रम स्तुत्य असून या स्पर्धेतून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होतील,असे प्रतिपादन युवा सेनेचे जिल्हाप्रमुख तथा सिंधुदुर्ग बँकेचे संचालक सुशांत उर्फ बाबू नाईक यांनी केले. आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली शहर युवासेनेच्यावतीने चौंडेश्वरी मंदिर समोरील फौजदारवाडी येथील मैदानावर आयपीएलच्या धर्तीवर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे.या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना नेते तथा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत व सेना नेते संदेश पारकर यांच्या हस्ते झाले या प्रसंगी श्री.नाईक बोलत होते.
यावेळी शिवसेनेच्या महिला आघाडीप्रमुख नीलम सावंत – पालव,उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये,जि.प.सदस्या स्वरूपा विखाळे,शहप्रमुख शेखर राणे , युवासेनेचे समन्वयक राजू राठोड,ॲड.हर्षद गावडे महिला शहरप्रमुख साक्षी आमडोसकर,दिव्या साळगांवकर,रोहिणी पिळणकर,प्रसाद अंधारी,सुनील पारकर,रुपेश आमडोस्कर, अमित मयेकर,युवा सेनेचे तालुका समन्वयक तेजस राणे , शहरप्रमुख आदित्य राणे , उपशहरप्रमुख सोहम वाळके , वैभव मालंडकर,जय शेट्ये,गुरु वाळके,मेघन संगरले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते . दरम्यान,क्रिकेट स्पर्धेचा पहिला सामना अक्षय स्पोटर्स विरुद्ध ब्राह्मणदेव परबवाडी यांच्यात खेळवण्यात आला.या स्पर्धेचे समालोचन उमेश परब यांनी केले.
ही स्पर्धा आयपीएलच्या धर्तीवर खेळवली जात असून यात ८ निमंत्रित संघांनी सहभाग घेतला आहे.या स्पर्धेतील अंतिम सामना उद्या खेळवला जाणार असून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वैभव मालंडकर, मयुर पेडणेकर,मेघन संगरले सोमनाथ पारगावकर,शुभम पेडणेकर,प्रथमेश चव्हाण,तन्मय नार्वेकर,ऋषी वाळके,आकाश कोदे,योगेश पेटकर यांच्यासह युवासैनिक मेहनत घेत आहेत.