वैभववाडी |नवलराज काळे : प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत कर्ज घ्या अशा आशयाचे अनेक जणांना फोन येत आहेत. परंतु अशा फसवणूक करणाऱ्या लोकांपासून सावध रहा व त्यांच्या आमिषाला बळी पडू नका असे आवाहन वैभववाडी पोलीस ठाण्यात तर्फे करण्यात आले आहे.
यापूर्वी राष्ट्रीयकृत बँकेतून बोलतोय असे ग्राहकांना फोनवरून सांगत खात्यावरील मोठ्या रोखड गायब झाल्याचे प्रकार घडले आहेत. सद्यस्थितीत सिंपली ॲसेट फायनान्स मर्यादित मुंबई या कंपनीच्या नावाने प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत नवीन कर्ज देण्यात येत आहे. त्या संधीचा आपण फायदा घ्या असे फोन करणारा व्यक्ती सांगत आहे. कर्ज घेण्यासाठी प्रोसेसिंग फी तुम्हाला दोन हजार किंवा तीन हजार इतकी भरावी लागेल. ती रक्कम आपण ऑनलाइन पद्धतीने भरा असे सांगत आहेत. परंतु या निव्वळ भूलथापा आहेत. अशा कोणत्याही कर्जपुरवठा करणाऱ्या योजना नाहीत. त्यामुळे नागरिकांनी अशा फसवणुकीला किंवा आमिषाला बळी पडू नये असे आवाहन पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी केले आहे.