चिंदर | विवेक परब : एका वाळू वाहतुकीच्या गाड्यांवर कारवाई न करता सहकार्य करण्यासाठी वाळू व्यावसायिकांनकडे 25 हजार रुपयाची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या मालवण तालुक्यातील वायंगणी तलाठी विठ्ठल कंठाळे यांना विशेष न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी आज 30 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला. तलाठी कंठाळे यांच्यावतीने वकील संग्राम देसाई, आविनाश परब व सुहास साटम यांनी काम पाहिले.
वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर कारवाई न करता सहकार्य करण्यासाठी कंठाळे यांनी व्यावसायिकाला काॅल करुन लाज मागितली होती असा आरोप आहे. या बाबतची तक्रार वाळू व्यावसायिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत वायंगणी तलाठी कंठाळे यांना सोमवारी 21 रोजी ताब्यात घेतले होते.
त्यानंतर त्यांना जिल्हा न्यायालयात हजर केले असता कंठाळे यांना लाच मागितल्या प्रकरणी विशेष न्यायाधीश आ. बी. रोटे यांनी दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. आज न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश रोटे यांनी कंठाळे यांना 30 रुपयांचा जामीन मंजूर केला.