बांदा | राकेश परब : इन्सुली बिलेवाडी मधील जिल्हा परिषद शाळा नजीक भरवस्तीत लावलेल्या सौर दीव्याची बॅटरीची चोरी करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. तसेच नजीकच्या घरात घुसण्याचा प्रयत्नही केला. मात्र बिलेवाडी युवकांच्या सतर्कतेमुळे चोरीचा डाव फसला.
शिमगोत्सवाचे कार्यक्रम सुरु असल्याने त्याचा फायदा घेत सोमवारी रात्री ११ च्या सुमारास जिल्हा परिषद शाळेकडील सौर दिव्याची बॅटरी चोरत असताना तेथील युवक अमेश कोठावळे गेला असता तेथुन चोरट्यानी दुचाकीने बॅटरी तेथे टाकून पळ काढला. युवकांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र ते फरार झाले.
याबाबत अधिक माहिती अशी कि, सध्या शिमगोत्सवा निमित्त बिलेवाडी येथील मांडावर रात्रीचे कार्यक्रम सुरु असतात. सोमवारी रात्री सुद्धा कार्यक्रम सुरु होते दरम्यान येथील युवक अमेश कोठावळे हा शेजारी मित्राकडे जात होता दरम्यान त्याला शाळेकडे कोण तरी असल्याचे निदर्शनास आले त्यांनी हाक मारली असता त्यांनी सौर दिव्याची काढलेली बॅटरी तेथेच टाकून दुचाकीने पलायन केले. अमेश याने लागलीच याबाबतची माहिती इतरांना दिली व काहींनी ओटवणे व पागावडीच्या दिशेने पाठलाग केला मात्र ते दोघेही फरारी झाले. दरम्यान बॅटरी काढायच्या अगोदर त्यांनी शाळेनजीकच्या घरात जाण्याचा प्रयत्न केला मात्र तो प्रयत्नही फसला होता.
परबवाडी येथील अमोल शिरोडकर हे बिलेवाडी येथून परतत असताना त्यांना एक दुचाकी दिसली होती मात्र शिमगोत्सव असल्याने कोणीही त्यांनी त्यांना काही विचारपूस केली नाही. या भागातून ओटवणे व चराठा परिसरात जाण्यासाठी रस्ता असल्याने यभागात नेहमी वर्दळ असते मात्र आता या प्रकारामुळे एकट्याला त्याभागातुन जाणे भीतीदायक झाले आहे. बांदा व सावंतवाडी पोलिसांनी गस्त घालून लवकरात लवकर चोरट्याना ताब्यात घ्यावे अशी मागणी होत आहे.