26.9 C
Mālvan
Wednesday, December 11, 2024
IMG-20240531-WA0007

डेगवे गांवचे सखाराम देसाई यांची पोलीस सब इन्स्पेक्टर पदी नियुक्ती.

- Advertisement -
- Advertisement -

बांदा | राकेश परब : सावंतवाडी तालुक्यातील डेगवे गावचे सुपुत्र तथा डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाचे कार्यकर्ते श्री सखाराम श्रीधर देसाई यांना नुकतीच मुंबईच्या पोलीस विभागात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी बढती मिळाली आहे.

श्री सखाराम तथा बाळा देसाई यांची पोलीस दलात प्रथम नियुक्ती सन १९८५ मध्ये झाली.त्यांनी मुंबईत देवनार,नार्कोटिक्स,एम.आरे मार्ग,भोईवाडा, डि.बि.मार्ग,डि.एन.नगर,मंत्रालय,व सध्या डोंगरी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत.
    
गेल्या ३६ वर्षाच्या पोलीस सेवेच्या कारकिर्दीत त्यांनी पोलीस नाईक,पोलीस हवालदार,सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक या पदावर त्यांनी चांगले काम केले आहे.या कार्यकाळात त्यांना एकूण ९७ बक्षिसे देऊन त्यांना गौरविण्यात आले  आहे.
    
त्यांच्या घरात पोलीस खात्याची  उज्ज्वल परंपरा आहे.त्यांच्या आजोबा  आणि वडिलांनी पोलिस दलात अधिकारी पदी काम केले आहे. त्यांचे धाकटे बंधू सुनील देसाई हे सावंतवाडी येथे पोलीस सेवेत कार्यरत आहेत.
      
त्यांच्या बढती बद्दल डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाचे अध्यक्ष तथा विलेपार्ले मतदार संघाचे माजी आमदार गुरूनाथ देसाई व सरचिटणीस उल्हास देसाई यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बांदा | राकेश परब : सावंतवाडी तालुक्यातील डेगवे गावचे सुपुत्र तथा डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाचे कार्यकर्ते श्री सखाराम श्रीधर देसाई यांना नुकतीच मुंबईच्या पोलीस विभागात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी बढती मिळाली आहे.

श्री सखाराम तथा बाळा देसाई यांची पोलीस दलात प्रथम नियुक्ती सन १९८५ मध्ये झाली.त्यांनी मुंबईत देवनार,नार्कोटिक्स,एम.आरे मार्ग,भोईवाडा, डि.बि.मार्ग,डि.एन.नगर,मंत्रालय,व सध्या डोंगरी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत.
    
गेल्या ३६ वर्षाच्या पोलीस सेवेच्या कारकिर्दीत त्यांनी पोलीस नाईक,पोलीस हवालदार,सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक या पदावर त्यांनी चांगले काम केले आहे.या कार्यकाळात त्यांना एकूण ९७ बक्षिसे देऊन त्यांना गौरविण्यात आले  आहे.
    
त्यांच्या घरात पोलीस खात्याची  उज्ज्वल परंपरा आहे.त्यांच्या आजोबा  आणि वडिलांनी पोलिस दलात अधिकारी पदी काम केले आहे. त्यांचे धाकटे बंधू सुनील देसाई हे सावंतवाडी येथे पोलीस सेवेत कार्यरत आहेत.
      
त्यांच्या बढती बद्दल डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाचे अध्यक्ष तथा विलेपार्ले मतदार संघाचे माजी आमदार गुरूनाथ देसाई व सरचिटणीस उल्हास देसाई यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.

error: Content is protected !!