चौके | अमोल गोसावी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या चौके- बावखोलवाडीचे सुपुत्र, वरिष्ठ गुप्तवार्ता अधिकारी (API)नेमणूक -राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई श्री.नितीन जयवंत मालप यांना सोमवार दिनांक २१ मार्च २०२२ रोजी राजभवन मुंबई येथे राज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते त्यांच्या पोलीस दलातील ३४ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतील निष्कलंक व उत्कृष्ट कामगिरी करीता राष्ट्रपतींचे पोलीस पदक सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.
चौके बावखोल येथील मुळ रहिवासी नितीन जयवंत मालप यांचे बी.ए.पर्यंत शिक्षण मुंबईत झाले. १८ जून १९८८ ला मुंबई पोलीस दलात भरती झाली.त्यानंतर त्यांनी सशस्त्र दल नायगाव,साकीनाका पोलीस ठाणे , विशेष शाखा-१, गु.अ.वि,एम आय डी सी पोलीस ठाणे ,संरक्षण ठाणे ,अंधेरी पोलीस ठाणे ,समाजसेवा शाखा, गुन्हे शाखा, राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई याठिकाणी पोलीस दलातील कर्तव्ये पार पाडली.सेवा बजावत असताना आतापर्यंत नितीन मालप यांना ३८७ पारितोषिके मिळाली असून एकूण बक्षिसांची अंदाजे एकूण रक्कम २,७०,०००/-मिळाली आहे.स.न.२००६ मध्ये पोलीस महासंचालक यांच्याकडून सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले होते आणि आता पोलीस दलातील सर्वोच्च पदकापैकी एक पदक गुणवत्ता पूर्वक सेवेसाठी राष्ट्रपतींचे पोलीस पदक देऊन सोमवारी २१ मार्च २०२२ रोजी सन्मानपूर्वक गौरविण्यात आले. श्री. नितीन जयवंत मालप हे सद्या राज्य गुप्तवार्ता विभागात कार्यरत असून आतापर्यंत त्यांच्या कामगिरीचा चढता आलेख पाहता त्यांची आपल्या कर्तव्यावरील निष्ठा आणि प्रामाणिकता दिसून येते. श्री. नितीन मालप सांगतात त्यांनी मिळवलेल्या यशाचे श्रेय आपली कुलदेवता,आईवडील,कुटुंबीय,शुभेच्छूक हितचिंतकाना दिले आहे. नितीन मालप यांच्या या दमदार यशस्वी कामगिरीचा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हाला अभिमान वाटतो त्यांची ही कामगिरी पुढील पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.
श्री. नितीन मालप यांनी केलेल्या अभिमानास्पद कामगिरीने सर्वोच्च राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल चौके पंचक्रौशीतून अभिनंदन होत आहे.