कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : आमदार नितेश राणे यांनी नुकताच एक अनोखा उपक्रम राबविला आहे.
पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना “काश्मीर फाईल्स” हा चित्रपट भाजपा आमदार नितेश राणे यांच्याकडून दाखवण्यात आला.त्यासाठी मोठा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.या निमित्ताने पत्रकारांची कुटुंबे एकत्रितपणे काश्मीर मधील वस्तुस्थिती काय होती ही जणू शकले अशी प्रतिक्रिया यावेळी अनेक पत्रकारांनी व्यक्त केली.
रविवारी 20 मार्च रोजी “काश्मीर फाईल्स” हा चित्रपट कणकवलीत लक्ष्मी चित्रपट मंदिर येथे आमदार राणे यांच्यावतीने मोफत दाखविण्यात आला.
सुरवातीला आमदार नितेश राणे यांच्या वतीने
लक्ष्मी चित्रपट मंदिरचे व्यवस्थापक राजू मल्हार यांनी पत्रकारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.१८६ पत्रकार व त्यांच्या कुटुंबांनी हा चित्रपट पाहण्यासाठी सहभाग घेतला. दरम्यान अनेक पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आमदार नितेश राणे यांचे आभार माणलेत.तर काश्मीर मधील वस्तुस्थिती या चित्रपटातून पहावयास मिळाली.काश्मीर येथे एवढी भयावह स्थिती असेल हे आज या चित्रपटातुन कळल्याची प्रतिक्रिया पत्रकारांच्या कुटुंबीयांनी दिली.