चौके | अमोल गोसावी : मालवण तालुक्यातील धामापूर येथील मंदिरात धार्मिक उत्सव साजरा करणे मानपानावरून दोन गटात कोणत्याही प्रकारचे एकमत न झाल्याने मालवण तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी अजय पाटणे यांनी होळी उत्सव कालावधीत दोन्ही गटातील संबंधित व्यक्ती तसेच त्यांचे अनुयायी, कुटुंब सदस्य, हितचिंतक यांना मंदिर व होळीच्या कार्यक्रमात सहभागी घेण्यास, व्यत्यय आणण्यास, अथवा शांतता भंग करण्यास मनाई करून १४४ कलम लागू केले होते.
मात्र, या कलमाचा व कार्यकारी दंडाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मंदिर परिसरात सेवेत असलेले पोलीस कर्मचारी यांनी दिलेल्या तक्रारी वरून पाच जणांविरोधात मालवण पोलीस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी दंडाधिकारी यांच्या १४४ कलमाचा भंग व जिल्हाधिकारी यांच्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) अ, व अन्य कलमांचा भंग प्रकरणी भादवी कलम १४३, १४७, १८६, १८८, यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री. चव्हाण हे या प्रकरणी अधिक तपास मालवण पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.