तोंडवळी | विवेक परब : तोंडवळी तळाशील येथील ग्रामस्थ येत्या पंधरा ऑगस्टपासून बेमुदत उपोषण व आंदोलन करणार असल्याच्या पाश्र्वभूमीवर पतन विभागाचे उपअभियंता बोतिकर , जिल्हा परिषद सदस्य जेराँन फर्नांडिस, भाजप विभागीय अध्यक्ष संतोष कोदे,भाजप तालुका प्रमुख श्री धोंडी चिंदरकर, शक्ति केंद्र प्रमुख चंदू सावंत, चिंदर उपसरपंच दिपक सुर्वे, बुथ अध्यक्ष अण्णा कोचरेकर, मेस्त आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
शासनाने त्र्याण्णव लाख रुपयांचे फक्त इस्टीमेट तयार आहे. त्याचे प्रमुख असे तीन टप्पे केलेले आहे पहिला टप्पा बत्तीस लाखांचा आहे पण त्यालाही प्रशासकीय मंजुरी सुद्धा नाही. प्रशासकीय मंजुरी साठी प्रस्ताव पाठविला आहे परंतु अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे गेल्या 10 वर्षात आमदार यांनी काहीही केलेलं नाही त्याचा राग लोकांच्या मनात आहे. त्यासाठीच लोक उपोषणावर ठाम आहेत. यापूर्वी माजी खासदार निलेश राणे यांनी स्वखर्चाने जे काम केले त्यानंतर शासनाकडून कुठलेही काम झालेले नाही परंतु ना. नारायण राणे यांच्या माध्यमातून लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आणि आता राज्यातील सत्ताधार्यांच्या पोकळ आश्वासनांना लोक आता बळी पडणार नाहीत असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.