कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व तालुका कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी उपक्रम.
वैभववाडी | प्रतिनिधी : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व तालुका कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १५ व १६ मार्च रोजी ‘कृषी वैभव २०२२’ तालुकास्तरीय कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. प्रदर्शन उद्योजक विकास काटे यांच्या कॉम्प्लेक्ससमोरील सायंकाळी पटांगणावर होणार आहे.
उद्घाटन मंगळवारी १५ मार्चला आम.नितेश राणे यांच्या हस्ते झाले . या प्रदर्शनात कृषी व कृषी संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तालुक्यातील निवडक शेतकऱ्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा अशी मंगळवार दि. १५ मार्च रोजी सकाळी १० ते ११ वा. आंबा व काजू प्रशिक्षण – वक्ते पांडुरंग मोहिते कृषी कॉलेज फोडाघाट, सकाळी ११ वा. कृषी प्रदर्शन उद्घाटन, दु. २ वा. पशुसंवर्धन व देशी गोपालन- वक्ते महेश संसारे प्रवण फार्मर कंपनी, दु३ वा खरीप हंगाम लागवड तंत्रज्ञान वक्ते प्रसाद ओगले, कृषी महाविद्यालय फोंडाघाट, बुधवार दि. १६ मार्च रोजी सकाळी १० ते ११.३० वा. महिलांसाठी आहे.
प्रक्रिया उद्योग वक्ते मुराद अली – शेख, संकल्प प्रतिष्ठान कणकवली, दु. १२ वा. व्यावसायिक बांबू लागवड तंत्रज्ञान वक्ते अरुण वांद्रे, दु. २ वा. सुधारित ऊस लागवड तंत्रज्ञान वक्ते सुनील पाटील डी. वाय. पाटील साखर कारखाना गगनबावडा, समारोप ४वा.
या प्रदर्शनात शेतीविषयक खरेदी-विक्रीचे तीस स्टॉल लागणार आहेत. शेती अवजारे यांची माहिती, खरेदी विक्री, बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री, यावेळी करण्यात येणार आहे. तालुक्यातील महिला बचतगटांना अधिक प्रोत्साहन मिळावे, शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे ज्ञान अवगत व्हावे, हाच या प्रदर्शनामागील उद्देश आहे.
या प्रदर्शनात तालुक्यातील शेतकऱ्यांनी बचत गटांच्या सर्व महिलांनी तालुक्यातील लोकप्रति निधी प्रगतशील शेतकरी, शेतकरी मित्र कृषीदूत व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका आत्मा समिती अध्यक्ष जयेंद्र रावराणे, तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांनी केले आहे .
प्रगत शेतकरी हे सिंधुदुर्गाचे वास्तव बनण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषीतज्ञांचे मत असून संपूर्ण जिल्ह्यातून वैभववाडीतील या उपक्रमाचे स्वागत होत आहे.