मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तालुक्यातील मुणगे ग्रामपंचायत आणि एकता ग्राम संघ यांच्या सयुक्त विद्यमाने गावातील विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा श्री भगवती हायस्कूल येथे सन्मान करण्यात आला. याकरिता मुंबईस्थित आडबंदरचे सुपुत्र श्री आनंद मालाडकर यांचे सहकार्य लाभले.
यावेळी गावातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेच्या शिक्षिका, ग्रामसेविका, तलाठी, महिला पोलीस पाटील कृषी सहाय्यका आरोग्य, सेविका, आरोग्य समुदाय सेविका, आशा सेविका अंशकालीन परिचारिका ,अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, ग्राम संघाच्या अध्यक्ष,सचिव ,कोषाध्यक्ष, सी आर पी , महिला होमगार्ड , पोस्ट मास्तर, सहकारी सोसायटीच्या सचिव, महिला पत्रकार अशा ३८ महिलांना सन्मानित करण्यात आले.
महिला सरपंचापासून गावातील प्रत्येक प्रमुख पदावर महिला पदाधिकारी असणारे कदाचित मुणगे हे एकमेव गाव असावे असे प्रतिपादन यावेळी सरपंच सौ साक्षी गुरव यांनी केले. यावेळी ग्रामसेविका प्रीती ठोंबरे, पोलीस पाटील सौ साक्षी सावंत, सदस्या निकिता कांदळगावकर, रविना मालाडकर अंजली सावंत, पोस्टमास्तर प्रगती पेडणेकर, सहा शिक्षिका एम बी कुंज, सौ गौरी तवटे, तलाठी विणा मेहेंदळे, सौ मिताली हिर्लेकर, सौ प्रियांका ठाकूर, प्रियांका कासले, दुर्गा परब, अंकिता मुणगेकर, अश्विनी मेस्त्री आदी उपस्थित होत्या.