मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : देवगड तालुक्यातील मुणगे येथील
श्री भगवती हायस्कूलच्या १९७५च्या दहावीच्या विध्यार्थ्यांच्या बॅच कडून श्री भगवती एज्युकेशन सोसायटीला १ लाख ३० हजार रुपयांची आर्थिक स्वरूपात देणगी देण्यात आली. बॅचचे प्रतिनिधी व माजी विद्यार्थी संघ सचिव रत्नदीप पुजारे यांनी सदर रकमेचा धनादेश संस्था सचिव विजय बोरकर यांच्या जवळ नुकताच सुपूर्द केला.
यावेळी श्री भगवती एज्युकेशन सोसायटी उपाध्यक्ष श्री सुरेश बांदेकर, उपाध्यक्ष श्री विलास मुणगेकर, खजिनदार श्री सदाशिव लब्दे व सदस्य श्री दत्तात्रय घाडीगावकर, सिताराम परब आदी उपस्थित होते. संस्थेच्या वतीने प्रशालेत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांना माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून हातभार लाभेल त्यामुळे इतर बॅचच्या माजी विध्यार्थ्यांनी पुढे होऊन सहकार्य करावे असे आवाहन रत्नदीप पुजारे यांनी केले आहे.
आर्थिक मदतीसाठी महादेव प्रभू, गोविंद टीकम,कालिंदी मुणगेकर- नार्वेकर, संजीवनी जोशी- सरपोले,सूर्यकांत राऊत, दिलीप बागवे, प्रकाश सावंत, नंदा हिरलेकर- परब, डॉ. शिवाजी साठे,विजया व्हीं. मालकर-सावंत, हेमचंद्र परब, मिरा जोशी- कुलकर्णी, पुष्पा कुवळेकर- तांबे, मंगला ग. मुणगेकर-कोडगे, शुभांगी म. गुरव-सोमेश्वरकर, मंदा हिरलेकर-साळगावकर,श्रीपाद आडकर, सुरेश मुणगेकर, किशोर प. महाजन, संजय कदम, रत्नदिप पुजारे या विध्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. संस्थेच्या वतीने उपाध्यक्ष सुरेश बांदेकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केले.