चिंदर | विवेक परब : महिला दिनाचे औचित्य साधून ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन च्यावतीने मालवण तालुक्यातील नांदोस गाव येथील सौ. संजना सचिन गावडे यांचा सत्कार करण्यात आला.
सौ. संजना गावडे या गेली पाच वर्ष नांदोस गावच्या तंटामुक्ती अध्यक्ष आहेत. तसेच नांदोस ग्रामसचिवालय याच्या सचिव म्हणून काम पाहतात, त्याचप्रमाणे त्या पंचक्रोशी मध्ये सामाजिक कार्यकर्त्या म्हणून परिचित आहेत. त्याचप्रमाणे महिलांच्या न्याय हक्कासाठी प्रयत्न करीत असतात, तसेच ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या मालवण तालुका महिला संघटक म्हणून कार्यरत आहेत. अशा व्यक्तिमत्त्वाचा महिला दिनाचे औचित्य साधून संघटनेतर्फे सन्मानपत्र व गुलाब पुष्प देऊन समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले. पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
सन्मानित करतेवेळी जिल्हाध्यक्ष संतोष नाईक , जिल्हा निरीक्षक मनोज तोरसकर, जिल्हा सचिव किशोर नाचणोलकर , मालवण तालुका सचिव राजेश लब्दे , खजिनदार रितेश सावंत, कणकवली तालुका सचिव मनोज वारे, कणकवली तालुका जनसंपर्क अधिकारी प्रवीण गायकवाड , सदस्य सौ. मीनल पार्टे , रोहित हडकर , माळकर तसेच नांदोस सरपंच व गावातील मोठ्या प्रमाणात महिलावर्ग उपस्थित होता.