26 C
Mālvan
Monday, December 23, 2024
IMG-20240531-WA0007

पळसंब मोबाइल टॉवर प्रलंबित प्रश्न महिन्याभरात दूर होणार!

- Advertisement -
- Advertisement -

सरपंच चंद्रकांत गोलतकर यांचे उपोषण तूर्त स्थगित

मसुरे | प्रतिनिधी : पळसंब येथील बीएसएनएल मोबाइल टॉवर बाबत प्रलंबित प्रश्न ३० सप्टेंबर पूर्वी दूर करण्यात येतील असे लेखी आश्वासन मालवण सब डिव्हिजनचे अधिकारी प्रविण कवडे यांनी पळसंब ग्रामपंचायत कार्यालयात भेट देत सरपंच चंद्रकांत गोलतकर याना शुक्रवारी दिले.
पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी या टॉवरच्या प्रलंबित मागण्या संदर्भात बीएसएनएल मालवण कार्यालयास १५ ऑगस्ट २०२१ रोजी उपोषण करण्याची नोटीस दिली होती.
येथील टॉवरचा महसुल विभागाचा शेतसारा तसेच जागेचे भाडे सुरवातीपासून थकीत आहे. महसूल विभागाकडून याबाबत ग्रामपंचायतला वारंवार विचारणा होत असल्याने ग्रामपंचायतने वेळोवेळी बीएसएनएल कार्यालयाशी संपर्क साधत लक्ष वेधले होते. त्याच प्रमाणे येथील टॉवर वरून सध्या 2 जी सेवा मिळत असून थ्री जी सेवा मिळावि याबाबत सुद्धा मागणी केली होती. सध्या शाळा बंद असल्याने ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी तातडीने थ्री जी सेवा मिळणे आवश्यक आहे. दरम्यान या प्रलंबित प्रश्नांन बाबत सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी उपोषण करण्याची नोटीस दिल्याने तातडीने बीएसएनएल अधिकाऱ्यांनी पळसंब ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच गोलतकर यांची भेट घेत सकारात्मक कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. बीएसएनएल कडून दिलेल्या कालावधी मध्ये तक्रार दूर न झाल्यास वरिष्ठ कार्यालयात दाद मागण्यात येणार असल्याचे सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी सांगितले आहे. यावेळी आचरा पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण, अक्षय धेडे, श्री देसाई, श्री कांबळे, ग्रामपंचायत कर्मचारी शैलेंद्र अणावकर आदी उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सरपंच चंद्रकांत गोलतकर यांचे उपोषण तूर्त स्थगित

मसुरे | प्रतिनिधी : पळसंब येथील बीएसएनएल मोबाइल टॉवर बाबत प्रलंबित प्रश्न ३० सप्टेंबर पूर्वी दूर करण्यात येतील असे लेखी आश्वासन मालवण सब डिव्हिजनचे अधिकारी प्रविण कवडे यांनी पळसंब ग्रामपंचायत कार्यालयात भेट देत सरपंच चंद्रकांत गोलतकर याना शुक्रवारी दिले.
पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी या टॉवरच्या प्रलंबित मागण्या संदर्भात बीएसएनएल मालवण कार्यालयास १५ ऑगस्ट २०२१ रोजी उपोषण करण्याची नोटीस दिली होती.
येथील टॉवरचा महसुल विभागाचा शेतसारा तसेच जागेचे भाडे सुरवातीपासून थकीत आहे. महसूल विभागाकडून याबाबत ग्रामपंचायतला वारंवार विचारणा होत असल्याने ग्रामपंचायतने वेळोवेळी बीएसएनएल कार्यालयाशी संपर्क साधत लक्ष वेधले होते. त्याच प्रमाणे येथील टॉवर वरून सध्या 2 जी सेवा मिळत असून थ्री जी सेवा मिळावि याबाबत सुद्धा मागणी केली होती. सध्या शाळा बंद असल्याने ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी तातडीने थ्री जी सेवा मिळणे आवश्यक आहे. दरम्यान या प्रलंबित प्रश्नांन बाबत सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी उपोषण करण्याची नोटीस दिल्याने तातडीने बीएसएनएल अधिकाऱ्यांनी पळसंब ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच गोलतकर यांची भेट घेत सकारात्मक कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. बीएसएनएल कडून दिलेल्या कालावधी मध्ये तक्रार दूर न झाल्यास वरिष्ठ कार्यालयात दाद मागण्यात येणार असल्याचे सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी सांगितले आहे. यावेळी आचरा पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण, अक्षय धेडे, श्री देसाई, श्री कांबळे, ग्रामपंचायत कर्मचारी शैलेंद्र अणावकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!