मालवण | वैभव माणगांवकर: शहरातील भरड नाक्यावर ,कोल्हापूर येथील माल वाहतूक करणार्या आयशर टेंपोचे चाक पायावरुन गेल्याने अपघातग्रस्त झालेल्या श्रीमती तारामती विष्णू परकर ह्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
श्रीमती परकर यांना अपघातस्थळीच प्रचंड रक्तस्त्राव झालेला होता.
स्थानिकांच्या मदतीने रुग्णवाहिकेतून श्रीमती परकर यांना इस्पितळात हलविण्यात आले होते परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
मालवण पोलिस अपघाताचा पुढील तपास करत आहेत.