23.7 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

नव उद्योजकांनी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या माध्यमातून मत्स्यव्यवसायामध्ये प्रकल्प करावेत : निलेश घाटकर

- Advertisement -
- Advertisement -

चिंदर | विवेक परब : श्री सद्गुरु सदानंद माऊली एज्युकेशनल फाउंडेशन , मत्स्यव्यवसाय कार्यालय आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना माहिती कार्यशाळा’ रविवार दिनांक ६ मार्च, २०२२ रोजी स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय,मालवण येथे आयोजीत करण्यात आली होती. यावेळी  खुल्या समुद्रातील पिंजरा मत्स्य संवर्धन , समुद्री शेवाळ संवर्धन, शिंपले संवर्धन, शोभिवंत मत्स्यपालन, मोठया आकाराचे RAS कप, बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धन आणि प्रकल्पासाठी अर्थसहाय्य मार्गदर्शन आदि विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यशाळेच्या पहिल्या सत्राचे उद्घाटन उद्योजक श्री . निलेश घाटकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून श्री . चंद्रशेखर पुनाळेकर,  उपाध्यक्ष – महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स , इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर, तसेच पर्यटन व्यावसायिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री. बाबा मोंडकर, मत्स्य उद्योजक श्री. मेहता उपस्थित होते.

कार्यशाळेमध्ये श्री. परमेश्वर नवघरे(व्यवस्थापक FSTO),  प्रशासकिय अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया, पणजी श्री. विनायक कुर्‍हाडे , जिल्हा समन्वयक तथा शाखाधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया , कुडाळ यांनी बँकेच्या विविध योजना आणि अर्थसहाय्याबद्दल मार्गदर्शन केले.
तर श्री. रविंद्र मालवणकर साहेब, प्र. सहा. आयुक्त , मत्स्यव्यवसाय विभाग, श्री. प्रदिप सुर्वे साहेब, प्रशिक्षण अधिकारी, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र , मालवण यांनी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेबद्दल मार्गदर्शन केले.

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोव्यातील 52 नव उद्योजकांनी कार्यशाळेचा लाभ घेतला. यावेळी संस्थेच्यावतीने मत्स्य संपदा योजना कार्यान्वित करण्यासाठी नवउद्योजकांना मार्गदर्शन, प्रकल्प अहवाल तयार करणे, आवश्यक ते प्रशिक्षण उपलब्ध करून देणे, प्रकल्प उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी बँका आणि नवउद्योजक यांच्यामध्ये समन्वय साधून आर्थिक पाठबळ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे यासारखी कामे आपल्या संस्थेमार्फत केली जाणार आहेत.
 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे संचालक श्री. महेश मांजरेकर यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक आणि आभार संस्थेचे श्री. भालचंद्र राऊत (सचिव), यावेळी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना माहिती कार्यशाळेचे समन्वयक श्री. राजेश साळगावकर आणि सहसमन्वयक श्री. अभिमन्यू गावडे उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

चिंदर | विवेक परब : श्री सद्गुरु सदानंद माऊली एज्युकेशनल फाउंडेशन , मत्स्यव्यवसाय कार्यालय आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने 'प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना माहिती कार्यशाळा' रविवार दिनांक ६ मार्च, २०२२ रोजी स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय,मालवण येथे आयोजीत करण्यात आली होती. यावेळी  खुल्या समुद्रातील पिंजरा मत्स्य संवर्धन , समुद्री शेवाळ संवर्धन, शिंपले संवर्धन, शोभिवंत मत्स्यपालन, मोठया आकाराचे RAS कप, बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धन आणि प्रकल्पासाठी अर्थसहाय्य मार्गदर्शन आदि विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यशाळेच्या पहिल्या सत्राचे उद्घाटन उद्योजक श्री . निलेश घाटकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून श्री . चंद्रशेखर पुनाळेकर,  उपाध्यक्ष – महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स , इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर, तसेच पर्यटन व्यावसायिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री. बाबा मोंडकर, मत्स्य उद्योजक श्री. मेहता उपस्थित होते.

कार्यशाळेमध्ये श्री. परमेश्वर नवघरे(व्यवस्थापक FSTO),  प्रशासकिय अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया, पणजी श्री. विनायक कुर्‍हाडे , जिल्हा समन्वयक तथा शाखाधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया , कुडाळ यांनी बँकेच्या विविध योजना आणि अर्थसहाय्याबद्दल मार्गदर्शन केले.
तर श्री. रविंद्र मालवणकर साहेब, प्र. सहा. आयुक्त , मत्स्यव्यवसाय विभाग, श्री. प्रदिप सुर्वे साहेब, प्रशिक्षण अधिकारी, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र , मालवण यांनी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेबद्दल मार्गदर्शन केले.

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोव्यातील 52 नव उद्योजकांनी कार्यशाळेचा लाभ घेतला. यावेळी संस्थेच्यावतीने मत्स्य संपदा योजना कार्यान्वित करण्यासाठी नवउद्योजकांना मार्गदर्शन, प्रकल्प अहवाल तयार करणे, आवश्यक ते प्रशिक्षण उपलब्ध करून देणे, प्रकल्प उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी बँका आणि नवउद्योजक यांच्यामध्ये समन्वय साधून आर्थिक पाठबळ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे यासारखी कामे आपल्या संस्थेमार्फत केली जाणार आहेत.
 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे संचालक श्री. महेश मांजरेकर यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक आणि आभार संस्थेचे श्री. भालचंद्र राऊत (सचिव), यावेळी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना माहिती कार्यशाळेचे समन्वयक श्री. राजेश साळगावकर आणि सहसमन्वयक श्री. अभिमन्यू गावडे उपस्थित होते.

error: Content is protected !!