मालवण | वैभव माणगांवकर: मालवण शहरातील भरड नाका येथे आज सकाळी पावणे अकराच्या दरम्यान परब इलेक्ट्रॉनिक्स समोरील रस्त्यावर भरड येथीलच रहिवासी असलेल्या महिला तारामती विष्णू परकर (75) यांच्या पायावरुन कोल्हापूर पासिंगच्या आयशर ट्रकाचे (एम एच.09 बि.सी.9815) मागील चाक गेल्याने महिलेला गंभीर ईजा झाली.
घटनास्थळीच महिलेचा पाय मोडल्याचे दिसत होते.
आयशर चालक सचिन कांबळी हा कोल्हापूरहून मालवण बाजारपेठेकडे येत होता.
ही घटना घडताच घटनास्थळी एकच गर्दी झाली आणि महिलेला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकाही दाखल झाली.
स्थायिक तरुणांच्या मदतीने महिलेला नवांगुळ हाॅस्पिटल,कुडाळ येथे दाखल करण्यात आले आहे..
सदर घटनेचा तपास पोलिस श्री परब,श्री टेंबुलकर करत आहेत.