मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे येथील भरतगड इंग्लिश मिडीयम स्कूल या प्रशालेत विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रयोगशाळेचे उद्घाटन डॉ. वीणा मेहेंदळे यांच्या हस्ते झाले. सरपंच श्री.संदीप हडकर, मुख्याध्यापक श्री किशोर देऊलकर, बापू मसुरेकर, जगदीश चव्हाण, पालक उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विविध प्रतिकृती तयार केल्या होत्या. विज्ञानाशी संबंधित वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली.
यामध्ये छोट्या गटासाठी विज्ञानाशी संबंधित व्यक्तिरेखा व मोठ्या गटासाठी भारतीय शास्त्रज्ञ ही संकल्पना ठेवण्यात आली होती. पर्यावरण जनजागृतीसाठी सेव्ह ॲनिमल या छोट्याशा नाटिकेचे सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयक चिकित्सक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी पझल रूम तयार करण्यात आली होती.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री किशोर देऊलकर यांची प्रेरणा लाभली. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विज्ञान शिक्षक पार्वती कोदे,संतोषी मांजरेकर,सिध्दी सांडव तसेच सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.