जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी घेतला गावनिहाय संघटनेचा आढावा
चिंदर | विवेक परब : देवगड तालुक्यातील युवासेना शिरगांव, देवगड- जामसंडे शहर, कुणकेश्वर विभागाच्या आढावा बैठका नुकत्याच जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आल्या. यावेळी त्यांनी गावनिहाय आढावा घेतला. रिक्त असलेल्या प्रत्येक गावात शाखाप्रमुख नेमणे, देवगड जामसंडे शहरातील सतरा च्या सतरा वॉर्ड मध्ये शाखा प्रमुख, उपशाखाप्रमुख यांच्या नेमणुका करणे, प्रत्येक पंचायत समिती मतदारसंघात उपविभागप्रमुख नेमणूक करणे, जिल्हापरिषद मतदार संघात विभागप्रमुख नियुक्ती करणे, कॉलेज युनिट स्थापन करणे, विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविणे आदीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी युवासेना कुणकेश्वर जि प मतदारसंघातील रिक्त असलेल्या विभागप्रमुख पदी गणेश वळके तर शिरगाव शाखाप्रमुख पदी रिक्त असलेल्या जागी प्रणय घाडी यांची निवड करण्यात आली. सदर निवडीचे पत्र युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी नुकतेच दिले आहे.
यावेळी त्यांच्या समवेत तालुकाप्रमुख मिलिंद साटम, महिला आघाडी उपजिल्हा संघटक पूर्वा सावंत, जिल्हा समन्वयक सुशील चिंदरकर, युवा तालुकाप्रमुख निनाद देशपांडे, नगरसेवक तेजस मामघाडी, उपतालुकाप्रमुख रविंद्र जोगल, विभागप्रमुख राजू तावडे, उपविभागप्रमुख प्रसाद दुखंडे, शाखाप्रमुख महेश मेस्त्री, विजय घाडी, ग्रामपंचायत सदस्या स्नेहा मेस्त्री, रश्मी घाडी, महेश मेस्त्री, शहरप्रमुख सौरभ माने, प्रथमेश तावडे, सागर गोरुले, महिला आघाडी उपतालुकासंघटक प्रगती तेली, हर्षा ठाकूर, नारिंग्रे सरपंच श्रीकांत गावकर, युवासेना उपतालुकाप्रमुख मनोज भावे, सिद्धेश माणगावकर, उपविभागप्रमुख शिवदास नरे, तुषार धुरी, मुकेश मयेकर, प्रसाद घाडी, गणेश गावकर, राजेंद्र उपातेकर, रोशन कोयंडे, प्रथमेश तेली, संतोष दळवीआदी शिवसेना युवासेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवासेनेच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.