सर्वच्या सर्व जागा जिंकत भाजप पॅनेलचे अधिपत्य ..!
चिंदर | विवेक परब : श्री रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या, आचरा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपप्रणित सहकार पॅनेलने नाट्यमय घडामोडी नंतर तेराही जागांवर बाजी मारत निर्विवाद वर्चस्व मिळविले शिवसेना पुरस्कृत पॅनेलचा धुव्वा उडवला. या सोसायटीवर शिवसेनेची सत्ता होती या निवडणुकीत भाजपने आपली निर्विवाद सत्ता आणत शिवसेनेला जोर का झटका दिला आहे. 13 उमेदवारसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत 12 उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले मात्र सेनेचा 1 उमेदवार एका मताने विजयी झाला होता. मात्र भाजप पुरस्कृत उमेदवारने फेरमोजणीची मागणी केल्यानंतर दोनदा झालेल्या फेरमोजणीत शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला.
भाजपने सर्वच्या सर्व जागांवर विजय संपादन केला. या विजयानंतर विजयी उमेदवारांसह भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. या सोसायटीची सन २०२१-२२ ते २०२६ -२७ या कालावधीसाठीची निवडणूक आचरा केंद्र शाळेत घेण्यात आली होती.
भाजपप्रणित सहकार पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी झाले. यामध्ये भाजप पुरस्कृत (सर्व साधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी) प्रिया वामन आचरेकर, समीर रघुवीर बांवकर, प्रफुल संजय घाडी, अवधुत रमाकांत हळदणकर, भिकाजी रावजी कदम, लवू नारायण मालंडकर, संतोष गणपत मिराशी, प्रशांत दाजी पांगे, भटक्या विमुक्त जाती / जमाती व विशेष मागास प्रवर्ग मधून प्रमोद विष्णू कोळंबकर, अनुसुचित जाती / जमाती प्रतिनिधी मधून लक्ष्मण भिवा आचरेकर, महिला प्रतिनिधी निशा गुणाजी गांवकर, मनाली महादेव तोंडवळकर, इतर मागास वर्गीय प्रतिनिधी मधून धनंजय दत्ताराम टेमकर विजयी झालेत. सर्व विजयी उमेदवारांचे भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, तालुका सरचिटणिस महेश मांजरेकर, आचरा जिल्हा परिषद सदस्य जेराँन फर्नांडीस, निवडणूक पक्ष निरीक्षक-संतोष गांवकर, निलिमा सावंत, आचरा सरपंच प्रणया टेमकर यांनी अभिनंदन केले.