मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग च्यावतीने इ 5 वी साठी जिल्हास्तरीय मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 135 परीक्षा केंद्रावर 2070 विद्यार्थ्यांना या सराव परीक्षेत सहभाग घेतल्याची माहिती जिल्हाध्यक्ष श्री नितीन कदम यांनी दिली. शिष्यवृत्ती सराव परीक्षा आयोजनासाठी सौ संजना सावंत अध्यक्षा जि प सिंधुदुर्ग, डॉ सौ अनिषा दळवी सभापती शिक्षण व आरोग्य जि प सिंधुदुर्ग यांनी परवानगी दिल्याने शिक्षक समितीने विशेष आभार मानले आहेत. कोवीड काळानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातील इ 5 वी शिष्यवृत्ती परीक्षेस सन 2021-22 साठी पात्र विद्यार्थ्यांच्या सरावासाठी जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षा आयोजन करणारी प्राथमिक शिक्षकांची एकमेव संघटना ठरली आहे. सराव परिक्षेची खास वैशिष्ट्ये जिल्हयातील 8 ही तालुक्यातील इ 5 वी जि प शाळांमधील 2070 विद्यार्थी 135 परिक्षा केंद्रावर सहभागी झाले होते. यामध्ये कुडाळ 315 विद्यार्थी 24 परिक्षा केंद्र, सावंतवाडी 426 विद्यार्थी 19 केंद्र, वेंगुर्ला 303 विद्यार्थी 14 केंद्र, देवगड 282 विद्यार्थी 22 केंद्र, कणकवली 254 विद्यार्थी 22 केंद्र, मालवण 240 विद्यार्थी 21 केंद्र, वैभववाडी 128 विद्यार्थी 3 परीक्षा केंद्र, दोडामार्ग 122 विद्यार्थी 10 केंद्राचा समावेश होता. शिष्यवृत्ती सराव परीक्षेच्या प्रश्नपत्रिका मराठी विषय बाळकृष्ण नांदोस्कर (पेंडूर संयुक्त मोगरणे, मालवण) ,रामचंद्र कुबल (आडवली नं 1 मालवण) ,गणित विषय संतोष नेरकर (आमडोस कदमवाडी मालवण) ,भरत काणेकर (मठ पाणलोस मालवण), इंग्रजी विषय सौ श्रध्दा वाळके (मसुरे भोगलेवाडी मालवण) ,बुध्दिमत्ता विषय विलास सरनाईक (नांदरूख आमडोस मालवण) या प्राथमिक शिक्षकांनी विशेष मेहनत घेऊन तयार केल्या आहेत. शिक्षक समितीने या सराव परिक्षेचा संपूर्ण खर्च केलेला असून जिल्ह्यातील 135 परीक्षा केंद्रांवर परीक्षेस बसलेल्या 2070 विद्यार्थ्यांना व पालकांनाही अल्पोपहार व्यवस्था केलेली होती. प्रत्येक तालुक्यातून टाॅप 10 विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार केली जाणार असून जिल्हास्तरीय टाॅप 10 विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांचा संघटनेच्या वतीन गुणगौरव कार्यक्रम आयोजित केला जाणार असल्याचे जिल्हाध्यक्ष नितीन कदम यांनी स्पष्ट केले. शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी नेहमीच आक्रमक असलेली शिक्षक समिती जिल्हयातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी शिष्यवृत्ती सराव परीक्षेसारखे विविध नाविण्यपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबवित असलेबाबत पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. या सराव परीक्षा आयोजनासाठी संघटनेच्या सर्व तालुका, जिल्हा पदाधिकारी, राज्य पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतलेली आहे. सर्व तालुक्यांच्या गटशिक्षणाधिकारी यांनीही मोलाचे सहकार्य दिल्याबद्दल शिक्षक समिती सिंधुदुर्ग ने आभार मानले आहेत.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -